BMC भविष्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरु करणार - आदित्य ठाकरे

या महापालिका शाळेत CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम असणार आहे.
ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session
ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session
Updated on

मुंबई: "भविष्यात महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या (ib board school) शाळा सुरु होतील आणि तिथे मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल" असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) शुक्रवारी म्हणाले. "महापालिकेचे (BMC) २४ वॉर्ड्स आहेत. तिथे प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेकडून CBSE आणि ICSE बोर्डाची शाळा सुरु होईल" असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते वरळीचे आमदार आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत. (BMC in future will start ib board school aditya thackeray)

अझीझ बागमध्ये महापालिकेच्या नव्या शाळेचे आदित्य ठाकरे यांनी काल उद्घाटन केले. ४०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली या शाळेत CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम असणार आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session
'मुघलांच्या काळातही वारकऱ्यांचे इतके हाल झाले नव्हते', आचार्य भोसलेंचा संताप

"ही शाळा सुरु होत असताना, स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची आपली भावना आहे" असे आदित्य ठाकरे म्हणाले. ४०० जागांसाठी २ हजार अर्ज आले आहेत. नवाब मलिक यांनी यावेळी, आपण स्वत: महापालिका शाळेत शिक्षण घेतलय असं सांगितलं. नागरिकांच्या मनात महापालिकेच्या शैक्षणिक संस्थांबद्दल विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं मत मलिक यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.