मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र, पावसाळा आल्यानंतर मुंबईकरांना हमखास त्रास देणारी बाब म्हणजे रस्त्यावरील खड्डे. यंदाही पावसाने रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईकर सजग झाले असून मुंबई महापालिकेकडे दीडशेहून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी आधीच खराब रस्ते त्यात संततधार पावसाची भर पडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सद्या मुंबईत कोरोनाच्या विरोधातील लढ्यात जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी उतरले आहेत. या कामांत गुंतल्यामुळे खड्डे व त्याबाबतच्या केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, उशिरा का होईना काही ठिकाणी खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले.
मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय....
दरवर्षी मुंबईतील रस्ते बांधकामासाठी कंत्राटदारावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कोरोनाचा संसर्ग मुंबईत रोज वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी गुंतलेले आहेत. त्यात कमी मनुष्यबळ असल्याने रस्त्यांच्या कामावर दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असल्याने पावसात अशा रस्त्यांची दुर्दशा होण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. रस्त्यावरील खड्डयांचे फोटो काढून काही जागरुक 'पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीम'वर तसेच 'माय बीएमसी पॉटहोल फिक्सिट' अॅपवर अपलोड करत आहेत.
ज्यामध्ये आतापर्यंत विविध प्राधिकरणाच्या हद्दीसह महापालिकेच्या हद्दीतील तसेच विभाग कार्यालय आणि रस्ते विभाग आदींच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर डांबरी रस्त्यांवरील खड्डा 24 तासांमध्ये तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डा 48 तासांच्या आतमध्ये भरणे बंधनकारक आहे. मात्र, खड्डे बुजविण्यात विलंब होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.