मुंबई : महानगरपालिका (BMC) घरा समोरील रस्त्यांवर वाहने (vehicles) उभी करण्यासाठी शुल्क लागू करण्याचा प्रयत्न (parking charges) गेल्या काही वर्षांपासून करत आहे. मात्र, महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या (bmc elections) तोंडावर संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक वाहनतळे (Public parking) मोफत करण्याची मागणी होऊ लगाली. समाजवादी पक्षाने (Samajwadi party) हा निवडणूक अजेंडा (election agenda) पुढे रेटला आहे.
सार्वजनिक ठिकाणी वाहाने उभी करण्यासाठी महानगर पालिकेमार्फत वाहानतळे उपलब्ध करुन दिली जातात.पुर्वी नाममात्र शुल्कात ही सुविधा होती. मात्र,काही वर्षांपुर्वी या शुल्कात अनेक पटीने वाढ झाली.त्यातच,इमारतींमध्ये पार्किंगची सोय नसलेल्या रस्त्यांवर वाहाने उभे करणाऱ्या रहिवाशांकडूनही पार्किंग शुल्क वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र,याची अद्याप अमंलबजावणी झालेली नाही."खासगी वाहानांची संख्या कमी करुन नागरिकांना सार्वजनिक परीवहन सेवा वापरण्यास ऊद्युक्त करण्यासाठी ही वाढ करण्यात आली' असे कारण प्रशासनाने त्यावेळी पुढे केले होते.
या वाढलेल्या शुल्कावरुन अनेक ठिकाही वादही झाले आहेत. त्यातच आता समाजवादी पक्षाचे महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी वाहानतळांचे शुल्क रद्द करुन पार्किंगची सुविधा नागरिकांना मोफत उपलब्ध करुन द्यावे, अशी ठरावाची सुचना महासभेत मांडली आहे. या महिन्याच्या कामकाजात त्यावर चर्चा होणार आहे. महानगरपालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा मागण्या केल्या जातात. त्याची ही सुरवातच मानली जात आहे.
वाहनतळांची संख्या
- रस्त्यावरील - 91
- बहुमजली 29
--क्षमता 20 हजार वाहानांहून अधिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.