मुंबई : दोन नद्यांच्या शुध्दीकरणासाठी 1 हजार कोटी

सांडपाणी अडवणे शक्य नसल्याने खर्च
BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : ओशिवरा आणि दहिसर नदीच्या (Dahisar river) शुध्दीकरणासाठी (Water purification) महानगरपालिका (BMC) तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. नद्यांमध्ये येणारे मैला, सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करणे, नदीच्या बाजूने रस्ते बनविण्याचे कामे करण्यात येणार आहे. खासगी सहभागातून महानगरपालिका हे मलजल केंद्र चालविणार असून तसा प्रस्ताव (proposal) बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. सर्व करांसह हा खर्च 1 हजार 305 कोटी रुपयांच्या आसपास जाणार आहे.न द्यांमध्ये येणारे सांडपाणी (Sewage) अडवणे शक्य नसल्याने महानगरपालिकेला हा हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लाग आहे.

BMC
राज्यसभा निवडणुकीतून भाजप माघार घेणार; रजनी पाटील बिनविरोध

महानगरपालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त दराने काम होणार आहे.महानगर पालिकेने दोन्ही नद्यांवर करण्यात येणाऱ्या कामासाठी 878 कोटी रुपयांचे अंदाज पत्र तयार केले होते.तर, प्रत्यक्षात 1 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे.या नद्याच्या परीसरात बांधण्यात येणाऱ्या मलजल प्रक्रिया केंद्र 15 वर्ष संबंधीत कंत्राटदारना चालवायचे आहे. मुंबईतील नद्याच्या रुंदीकरण,खोलीकरणावर महानगरपालिकेने आता पर्यंत शेकडो कोटी रुपयांचा खर्च केला आहे.मात्र,नद्यांमध्ये येणारे मैला आणि सांपडणी रोखण्यात गेल्या दिड दशकापासून अधिक काळापासून पालिकेला यश न आल्याने नद्याचे नालेच राहीले आहेत.

यावरुन हरित लवादाने महानगर पालिकेने नद्यांच्या शुध्दीकरणासाठी प्रकल्प राबविण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार हे प्रकल्प राबविले जात आहेत.महानगर पालिकेने यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा निवीदा मागवल्या होत्या.मात्र,प्रतिसाद न मिळाल्याने अंदाजित खर्चात वाढ करुन पुन्हा निवीदा काही महिन्यांनी निवीदा मागविण्यात आल्या.या निवीदांनाही अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली.अखेरीस 2021 मध्ये महानगर पालिकेला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे.

दहिसर नदी

अंदाजित खर्च -232 कोटी 71 लाख 34 हजार 841

प्रत्यक्ष प्रकल्पासाठी होणारा खर्च -281कोटी 15 लाख 69 हजार 332

-होणारी कामे

-मलवाहीन्यांचे बांधकाम - 4.4 किलोमिटर

पोहच रस्ते - 1.06 किलोमिटर

-पर्जन्य वाहीन्यांचे बांधकाम - 1.02 किलोमिटर

नाला इंटरसेप्टर -10 ठिकाणी

-मलजल प्रक्रिया केंद्र - दोन ठिकाणी मिळून 6.5 दशलक्ष लिटर प्रतिवर्ष

BMC
वयोवृद्ध महिलेकडील दागिने पळविणार्‍या तिघांना अटक

ओशिवरा (वालभाट)नदी

-अंदाजित खर्च -637 कोटी 21 लाख 73 हजार १८३

प्रत्यक्ष प्रकल्पासाठी होणारा खर्च -631कोटी 41 लाख 97 हजार 499

-होणारी कामे

-मलवाहीन्यांचे बांधकाम - 4.7 किलोमिटर

पोहच रस्ते - 4.68 किलोमिटर

-पर्जन्य वाहीन्यांचे बांधकाम - 5.10 किलोमिटर

नाला इंटरसेप्टर -6 ठिकाणी

संरक्षक भिंतीचे बांधकाम - 1.79 किलोमिटर

-मलजल प्रक्रिया केंद्र - पाच ठिकाणी मिळून 20.5 दशलक्ष लिटर प्रति दिन

म्हणून हजारो कोटींचा खर्च

नदीच्या लगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये मलवाहीन्या बांधणे शक्य नसल्याने महानगर पालिकेला हा हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.दहिसर,ओशिवरा नदी बरोबरच येत्या काळात महानगर पालिका पोयसर नदीच्या शुध्दीकरणासाठी असा शेकडो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.तर,यापुर्वी मिठीच्या नदीच्या शुध्दीकरणासाठी 750 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.झोपडपट्ट्यांमध्ये मलवाहीन्या बांधणे शक्य नसल्याने तेथून येणारे मैलापाणी अडवून ते प्रक्रिया केंद्रांत वळविण्यात येणार आहे.प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करुन ते पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे.

अशा वाहतात नद्या

ओशिवरा--गाेरेगाव येथील आरे वसाहतीतील टेकडीत उगम पाऊन 7.31 किलोमिटरचा प्रवास करुन ही नदी मालाड खाडीत विसर्जीत होते.साधारण 2 हजार 474 हेक्टरचे पाणलोट क्षेत्र असून संतोषनगर,रिध्दी - सिध्दी,बिंबीसार नगर,नंदादिप ,नेक्सो,मजासनगर,ज्ञानेवश्‍वर नगर असे अनेक नाले येऊन मिळतात.

-दहिसर -संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पाऊन 4.7 किलोमिटरचा प्रवास करुन मनोरी खाडीत मिळते.श्रीकृष्ण नगर,आंबेवाडी येथील तबेल्यातील पाणी थेट नदीत सोडले जाते.तसेच,नागरी वसाहतींसह धोबीघाटातील दुषित पाणीही नदीत सोडले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.