मुंबई : मुंबईची आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे, हे कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने स्पष्ट झाले. त्यानुसार, लवकरच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात विविध विषाणूच्या संसर्गाच्या चाचणीसाठी अत्याधुनिक लॅब उभारण्याचा निर्णय घेतला असून भविष्यात मुंबईत कुठलाही आजार आल्यास त्या आजाराशी दोन हात करण्याची तयारी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्याचा निर्णय पालिका आरोग्य विभागाने घेतला आहे. भविष्यात कुठल्याही आजार आल्यास सर्वात आधी चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार चाचण्या वाढवण्यासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत.
मुंबईत दरवर्षी पावसाळी आजार डोके वर काढतात. मलेरिया, डेंगी, कावीळ, गॅस्ट्रो , एच1 एन 1, एचआयव्ही या आजारांचे वेळीच निदान झाले तर त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम आहेच. परंतु, चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला. जगावर कधी कुठले संकट येईल हे कोणीच सांगू शकत नाही. भारतातही कोरोनाचा कहर आजही पाहायला मिळत आहे. मुंबई कोरोनाच्या हिटलिस्टवर असून रोज दोन हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी पालिका योग्य त्या उपाययोजना करत आहे. परंतु , कोरोनावर मात मिळवल्यानंतर भविष्यात मुंबईवर कुठल्याही आजाराचे संकट ओढावल्यास त्या आजारावरची पहिली चाचणी कस्तुरबा रुग्णालयात करण्यात येईल. त्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
2007 ला ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या लॅबमध्ये वेगवेगळे संशोधन केली जात आहेत. डेंगी, लेप्टोचा, हेपेटायटीस, एचआयव्ही या आजारांच्या संसर्गासाठी पीपीआर सेट अप तयार केला गेला आहे. यावर आधीपासूनच अभ्यास केला जात आहे. मात्र आता या आजारांव्यतिरिक्त येणारे जे व्हायरस आहेत त्याच्यासाठी पालिका तयारीला लागली आहे.
बीएसएल 3 लॅबची होणार निर्मिती -
कस्तुरबामध्ये आधीपासून एक लॅब आहे. त्यानंतर आता अजून एक बीएसएल 3 लॅब तयार केली जाणार आहे. ही लॅब अत्याधुनिक असून त्यात चाचण्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यात व्हायरल कल्चर, किंवा आणखी व्हायरसबाबतची चाचणी केली जाईल.
रक्तात असणाऱ्या व्हायरस, इतर कोरोना व्हायरस, श्वासासंबंधित ते व्हायरस, मेनिंगजायटीस व्हायरस या सर्व व्हायरसची चाचणी केली जाणार आहे. या लॅबसाठी जागा ही निश्चित केली आहे. लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन त्यासाठी लागणाऱ्या मशीन्सही खरेदी केल्या जाणार आहेत.
बीएसएल 3 लॅब म्हणजेच बायो सेफ्टी लेवल 3 असे या लॅबचे नाव असेल अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयातील मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी दिली आहे.
bmc ready to fight any virus threat in future sophisticated lab will be set up in kasturba
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.