मुंबई महापालिकेत भंगार घोटाळा ; 'BMC' ला कोट्यावधींचा फटका

bmc
bmcsakal media
Updated on

मुंबई : महापालिकेत (bmc) रस्ते, भुखंड,औषध, उपकरणे खरेदीच्या घोटाळ्याचे आरोप होत होते. तर,आता भंगार घोटाळा (scrap scam) झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या घोटाळ्यामुळे पालिकेला कोट्यावधीचा फटका बसला आहे. महानगरपालिकेने 2700 मिमी व्यासाच्या ब्रिटीश कालीन जलवाहीन्या (British pipeline) भंगारात काढल्या आहेत.हे 10 हजार मेट्रीक टन वजनाचे पाईप विकून पालिकेला 32 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र,पालिका प्रशासनाने यासाठी निवीदा (tender) न मागवता परस्पर विक्री केली (private sailing) असून 32 रुपये किलोने विक्री झाली आहे. 2020 च्या दरानुसार ही विक्री करण्यात आली. सध्याचा भंगार दर 48 रुपये किलो आहे.तर दुसऱ्या खरेदी दाराने 37 रुपये दराने खरेदी करण्याची तयारी दाखवली होती.

bmc
अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई संकुलात परतण्यास परवानगी

बाजरभावानुसार पालिकेला 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.पालिकेनेने निवीदा काढून विक्री केली असती तरी उत्पनात वाढ झाली असती असा दावा भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी केला आहे.महापालिकेकडून केल्या जाणार्या खरेदीवर, तसेच प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते.पुर्वी बेस्ट उपक्रमातील भंगार विक्रीवरही आरोप झाले आहेत.मात्र,पहिल्यांदाच पालिकेच्या भंगार विक्रीवर आरोप झाला आहे.या पिरस्तावाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित मंजूरी दिली आहे. पालिकेकडे 45 भंगार खरेदी दारांची नोंदणी आहे.त्यांच्याकडून अंदाजपत्र मागवले असते तरी उत्पन्नात वाढ झाली असती असा दावा केला जात आहे. मात्र,ठराविक खरेदीदाराला हा माल विकल्या बद्दल आक्षेप घेण्यास सुरवात झाली आहे.-

चौकशीची व्हायला हवी

अशा प्रकारे निवीदा न काढता विक्री का झाली हा प्रश्न आहे.हा निर्णय कोणी घेतला याबाबतही चौकशी झाली पाहिजे असेही मिश्रा यांनी नमुद केले.तसेच यापुर्वीच्या भंगार खरेदीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही पत्र देण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.