मुंबईत महापालिका राबवणार सहावा सिरो सर्वे

कोविड 19 लसीकरणातून तयार होणाऱ्या अँटीबॉडीजसाठी 24 वॉर्डात सिरो सर्वेक्षण
BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (bmc) सहावा सिरो सर्वे (sero survey) करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड 19 लसीकरणातून (corona vaccination) तयार होणाऱ्या अँटीबॉडीजसाठी (antibodies) 24 वॉर्डात सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. 16 जानेवारी 2022 रोजी मुंबईतील सामूहिक लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होईल. त्याआधी शहरातील 24 प्रभागांमध्ये सहावे सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने (bmc decision) घेतला आहे. शिवाय, मुंबईतील पहिला डोसही (vaccination first dose) लवकरच पूर्ण होणार आहे. यावरुन पालिकेला सिरो सर्वेक्षण करणे सोपे होईल.

BMC
मुंबई पोलिसांना पाहून पळताना आरोपी तिसऱ्या मजल्यावरुन पडला

पालिकेला आधीच्या विषाणूच्या संसर्गाचे पुरावे मोजायचे आहेत आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज तयार करण्यावर होणारा परिणाम समजून घ्यायचा आहे. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की ते पुढील महिन्यात सर्वेक्षणाची तयारी सुरू करतील ज्यासाठी या महिन्यात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. यासाठी लवकरच प्रभाग स्तरावर बैठका घेतल्या जाणार आहेत.

पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या दोन लाटांमध्ये मुंबईत सात लाखांहून अधिक लोकांवर परिणाम झाला. पालिकेने 99 टक्क्यांहून अधिक मुंबईकरांना कोविड लसीचा पहिला डोस दिला आहे. किती नागरिकांना विषाणूची लागण झाली आहे आणि लसीकरणामुळे त्यांच्यात अँटीबॉडीज विकसित करण्यास कशी मदत झाली आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. वॉर्ड स्तरापर्यंतची ही माहिती आगामी काळात रणनीती आखण्यास मदत करेल.

BMC
"मलिक आजोबांच्या छान छान गोष्टी परिकथांच्या पुस्तकांमध्ये अजरामर होतील"

सेरो सर्वेक्षणाच्या अहवालानंतर लोकांसाठी लसीकरणासंबंधित आणखी प्रभावी योजना देखील तयार केल्या जाऊ शकतात. 24 वॉर्डांमधून सुमारे 10,000 लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले जातील. पालिका रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, मुंबईतील नागरिकांनी दोन लाटांचा सामना केला आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात नागरिकांना लसीचा किमान एक डोस मिळाला असल्याने, नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली असावी. याशिवाय, पूर्वीच्या सर्वेक्षणांमध्येही प्रतिपिंड असलेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये मुंबईत महानगरपालिकेने केलेल्या पाचव्या सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले की सर्वेक्षण केलेल्या 8,674 लोकांपैकी सुमारे 86.64 टक्के लोकांमध्ये कोविड-19 विरूद्ध प्रतिपिंडे विकसित झाली होती. चौथ्या सेरो सर्वेक्षणात लहान मुलांमध्ये घेण्यात आला होता. त्यात सुमारे 50 टक्के मुलांमध्ये कोविड -19 विरूद्ध प्रतिपिंडे विकसित झाली आहेत. तिसरे सेरो सर्वेक्षण, जे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात 10,197 लोकांपैकी 36.3 टक्के लोकांमध्ये कोविड -19 विरूद्ध प्रतिपिंडे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()