मुंबई : ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, मुदतीत कर भरणा न केल्यास थकबाकीदाराच्या जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. जप्त वस्तुतूनही कर वसूल झाला नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.