गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली 'ही' अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता होणार सुरु, पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास...

गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली 'ही' अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता होणार सुरु, पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास...
Updated on

मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनामुळे आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. अशात  कोरोनामुळे बालके आणि लहान मुलांचे लसीकरण रखडले आहे. गेल्या दोन महिन्यात अत्यंत अल्प प्रमाणात लसिकरण झाले असून पालिकेची शिबीरेही झाली नाहीत. मात्र, लसिकरण विलंबाने झाल्यास घाबरण्याचे कारण नाही असा दावा पालिकेकडून केला जात आहे.

लसिकरणासाठी पालिका प्रत्येक आठवड्यात दोनवेळा शिबीरी आयोजित करते. मात्र, गेल्या दोन महिन्यात सदर शिबिरं घेतली गेली नाहीत. मुंबई महानगर पालिकेची संपुर्ण आरोग्य  यंत्रणा कोविड प्रतिबंधाच्या कामात व्यस्त असल्याने ही शिबिरं घेण्यात आली नाहीत. तसेच खासगी दवाखानेही बंद असल्याने सर्वच बालकांच्या लसिकरणाचा डोस चुकला होता. पालिकेचे दवाखाने रुग्णालये सुरु असली तरी नागरीक कोरोनाच्या भितीपोटी लहान मुलांना घेऊन दवाखान्यांमध्ये जात नव्हते.अशात आता ही शिबिरं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिकेचे फिव्हर क्लिनीक सोडून सर्व  दवाखान्यांमध्ये आठवड्यातून एक दिवस सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत लसीकरणाची शिबिरं होणार आहेत. प्रसुतीगृहात आठवड्यातून दोनदा लसीकरण शिबिरं होणार आहेत. या बाबतचे परिपत्रक पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिध्द केलं आहे. केंद्रीय शिबिरातून ही लसीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.

लसिकरण विलंबाने झाल्याने घाबरण्याचे कारण नाही. फक्त दोन डोस मधिल अंतर यापुढे योग्य पध्दतीने पाळणे आवश्यक आहे.असा दावा पालिकेने केला.

BMC to start kids vaccination program after alomost two month in mumbai 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()