पूरग्रस्तांची तहान भागणार, महापालिकेच्या पथकाकडून टँकरने पाणी पुरवठा

Water Tanker
Water TankerSakal media
Updated on

मुंबई : कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) पुरग्रस्तभागात (Flood Area) महानगरपालिकेच्या (BMC) पथकांनी काम सुरु केले आहे. महाडमधील पुरग्रस्त भागात पालिकेने टँकरने पाणी पुरवठा (Tanker Water) केला असून पुढील काही दिवस हे टँकर त्याच परीसरात राहाणार आहे. (BMC started giving water through tanker service in flooded area- nss91)

पुरग्रस्त भागात महानगर पालिकेने वैद्यकिय पथके,आपत्ती निवारण पथके पाठवली आहेत.त्याच बरोबर स्वच्छता पथकेही पाठवली आहेत.या काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाड मध्ये पाण्याचे दोन टँकरही पाठविण्यात आले आहे.पहिल्या फेरीत हे टॅंकर मुंबई मधून भरुन पाठविण्यात आले आहेत.आता पुढील काही दिवस हे टँकर तेथेच राहाणार आहे.

Water Tanker
आरक्षीत भूखंडाबाबत महापालिकेने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

याच बरोबर पालिकेने पशुवैद्यकांचेही पथक पाठवले आहे.या पथकानेही त्यांचे काम सुरु केले आहे. रायगड जिल्ह्यात 23 जणांचा चमु पोहचला आहे.यात प्रामुख्याने पशु वैद्यकिय अधिकारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.पशुवैदकांनी प्राण्याची तपासणी सुरु केली आहे.जखमी प्राण्यावर उपचार करणे,राेगप्रतिबंधक लसीकरण करणे अशी कामे सुरु झाली आहे.तर,स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी फवारणी सुरु करणे स्वच्छता करणे अशी कामे सुरु केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.