BMC : मासळी बाजारातून थर्माकॉलच्या पेट्या होणार हद्दपार

BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : मासळी बाजारातून (Fish Market) थर्माकॉलच्या पेट्या (thermocol boxes) हद्दपार करण्यासाठी महानगरपालिका (BMC) प्लास्टीकचे कंटेनर (plastic containers) मासळी विक्रेत्यांना (Fish traders) देणार आहे. मात्र, या प्रत्येक कंटेनर पोटी महानगरपालिका किमान 500 ते 1 हजार रुपये जास्त मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.

BMC
नवी मुंबईत १२ नोव्हेंबरपासून युवक काँग्रेसच्या निवडणुका

महानगरपालिकेच्या मंडईत 3 हजार 741 परवानधारक कोळी महिला आहेत. यातील 578 कोळी महिलांना गेल्यावर्षी प्लास्टीक कंटेनर्ससाठी अर्थसहाय्य देण्यात आले. यावर्षी महानगरपालिका उर्वरीत महिलांना असे कंटेनर्स स्वत: विकत घेऊन देणार आहे. 50,60 आणि 70 लिटर क्षमतेचे आईस बॉक्‍स तीन आईस बॉक्‍स कंटेनर्स पालिका विकत घेऊन देणार आहे. 3 हजाराच्या आसपास विक्रेत्यांना कंटेनर्स देण्यासाठी महानगर पालिका 4 कोटी 27 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. या खरेदीचा प्रत्येक प्रशासनाने मंगळवारी (ता.2) रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला आहे.

या 50 लिटरच्या कंटेनरसाठी पालिका प्रत्येकी 2 हजार 930 रुपये,60 लिटरच्या कंटेनरसाठी प्रत्येकी 4 हजार 1 रुपया. तर,70 लिटरच्या कंटेनरसाठी 6 हजार 624 रुपयांचा खर्च करणार आहे.या कंटेनर्सच्या किंमती ऑनलाईन तपासल्या असत्या 60 लिटरचे कंटेनर 3 हजार पासून 3 हजार 500 रुपयां पर्यंत तर 70 लिटर कंटेनर्सची किंमत 5 हजार ते 5 हजार 500 रुपयां पर्यंत उपलब्ध आहेत. त्यामुळे या खरेदीवरुन वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

BMC
"एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका"

148 महिला अपात्र

मुंबईतील 3 हजार 163 महिलांना या टप्प्यात कंटेनर बॉक्‍स देण्यात येणार होते.त्यातील 148 महिला या मुंबई बाहेरील रहिवाशी असल्याने त्यांना हे कंटेनर देण्यात येणार आहे.पालिकेच्या जेंडर बजेट अंतग्रत ही खरेदी करण्यात येणार आहे.यात,योजनेचा लाभार्थी हा मुंबईचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे.अशी माहिती या प्रस्तावात नमूद आहे.

म्हणून कंटेनरची खरेदी

राज्य सरकारने राज्यात प्लास्टीक आणि थर्माकॉल तसेच इतर अविघटनशिल वस्तूंच्या वापरावर निर्बंध आणले आहेत.मासेविक्रत्या महिला मासे साठविण्यासाठी थर्माकॉलचे कंटेनर वापराचे.हे कंटेनर वारंवार तुटत असल्याने त्याचा कचराही व्हायचा.असे कंटेनर्स काही अपवादात्मक परीस्थीतीत वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.त्यामुळे महानगर पालिकेने मासळी बाजारातील थर्माकॉल हद्दपार करण्यासाठी हे दिर्घकाळ वापरता येणारे कंटेनर्स महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()