मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या खार येथील घरातील बेकायदा बांधकामाला महानगर पालिकेने पाठवलेल्या नोटीसवर स्थगिती देण्यास दिंडोशी महानगर दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महानगर पालिकेने सहा आठवड्यानंतर कारवाईबाबत दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने वर्षभरापूर्वी महापालिकेच्या एच पश्चिम प्रभाग कार्यालयाने खार येथील डी.बी.ब्रीझ या इमारतीतील घरांमध्ये बेकायदा बांधकाम केल्याबद्दल कंगनासह इमारतीमधील इतर रहिवाशांना नोटीस पाठवली होती. या नोटीसला कंगनाच्या वतीने दिंडोशी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे आव्हान देण्यात आले होते. त्यावर बुधवारी महानगर दंडाधिकारी यांनी पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र यासाठी उच्च न्यायालयाद दाद मागण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे महानगर पालिकेलाही तत्काळ कारवाई करता येणार नाही. सहा आठवडे उलटल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी विनायक विसपुते यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. कंगनाने संक एरिया, डक्ट, कॉमन पॅसेज यात काही बदल केले आहे, असा दावा पालिकेच्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
------------------------
(संपादन- पूजा विचारे)
bmc will take decision on action against Kangana Ranavat house after 6 weeks
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.