BMC : महापालिका कर्मचाऱ्यांना 51 हजार रुपये बोनस द्या; मजदूर संघाची मागणी

BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्ग (Mumbai corona infection) नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या कामगारांनी (BMC Workers) जीव ओतून काम केले. रुग्णसंख्या वाढू (corona patients) नये म्हणून जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेसहीत सर्व कामगार, अधिकारी अहोरात्र मुंबईतील नागरिकांची सेवा करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. यास्तव त्यांना प्रोत्साहन म्हणून यावर्षी महापालिका कामगार, कर्मचारी यांना सरसकट 51 हजार रुपये बोनस / सानुग्रह अनुदान (Payment of bonus) दिवाळी पूर्वी देण्यात यावे अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव (prakash jadhav) यांनी पालिका आयुक्तांकडे (bmc commissioner) केली आहे.

BMC
ठाणे : महारक्तदान सप्ताहात विक्रमी रक्तसंकलन

या संबंधीचे पत्र त्यांनी मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत , विरोधी पक्षनेता, रवि राजा, स्थायी समिती अध्यक्ष , यशवंत जाधव यांना दिले आहे. मुंबईत कोरोना महामारी साथीच्या रोगाने हाहा:कार माजवलेला आहे. दिवसेदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. अशा परिस्थिती कामगारांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून त्याचा विचार करण्याची मागणी ही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.