मुंबईत येणार कोरोनाचा स्पाईक? मुंबईत पालिकेकडून 'या' नव्या ठिकाणी आयशोलेशन बेड्स तयार...

मुंबईत येणार कोरोनाचा स्पाईक? मुंबईत पालिकेकडून 'या' नव्या ठिकाणी आयशोलेशन बेड्स तयार...
Updated on

मुंबई - कोरोनानं देशभरात धुमाकूळ घातला असताना महाराष्ट्रातली परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. त्यातच मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकार विविध पातळीवर आपले प्रयत्न करताहेत. मुंबईतली कोरोना व्हायरसमुळे उद्धभवलेली परिस्थिती मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा कंबर कसली आहे. 

मुंबई महापालिका नवीन आयसोलेशन बेड्स तयार करत आहेत. त्यापैकी 300 बेड्स महालक्ष्मी रेसकोर्समध्ये तर 100 बेड्स नेहरु सायन्स सेंटरमध्ये तयार करण्यात येताहेत. त्यासोबतच 200 बेड्स नेहरु प्लॅनेटेरियम, 500 बेड्स बीकेसीच्या MMRDA च्या मैदानावर, 200 बेड्स रिचर्डसन क्रूडास आणि NSCI च्या येथे आयसीयूची नवी सुविधा करण्यात आली आहे. 

मुंबई महापालिकेकडून सुरु असलेल्या या आयसोलेशनच्या तयारीवरुन लक्षात येतं की, येत्या काही दिवसात मुंबईत आणखी परिस्थिती चिंताजनक होणार आहे. सोमवारी, तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली. दक्षिण मुंबईत कोरोनाचा जास्त धोका उद्भवला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं नवीन आयसोलेशन बेड्स तयार करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. 

महालक्ष्मी रेसकोर्समध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगचा भाग मोकळा आहे. त्यामुळे रेसकोर्सच्या पार्किंगमध्ये पालिकेनं 200 बेड्स आयसोलेशनची सुविधा केली आहे. रेसकोर्सपासून हाकेच्या अंतरावर असलेलं नेहरु सायन्स सेंटर आणि नेहरु प्लॅनेटेरियम येथे 200 आणि 100 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. जे. जे. हॉस्पिटलजवळील रिचर्डसन क्रुडास कारखान्यात 200 आयसोलेशन बेड्स जोडल्या आहेत. माहिम येथे नेचर पार्क येथे 600 बेड्सची सुविधा केली असून MMRDA मैदानावर लवकरच 500 बेड्सचा वेगळा वॉर्ड असणार आहे. 

मुंबई शहरात सोमवारी 510 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकमेव मुंबई शहराचा आकडा 9 हजारच्या पार गेला आहे. सोमवारी 18 जणांचा मृत्यू झाला तर मृतांचा आकडा 361 झाला आहे. 

महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितलं की, शक्य तितक्या लवकर 76 हजार बेड्स तयार करण्याचे पालिकेचं लक्ष्य आहे. या घटनेसाठी आमच्याकडे योजना आखण्यात आलीय. 

जागतिक आरोग्य, बायोएथिक्स आणि आरोग्य धोरणाचे संशोधक अनंत भान म्हणाले की, कोरोनाबाधितांच्या संख्यांबद्दल युक्तिवाद करता येणार नाही. जर पालिका अशा मोठ्या संख्येनं वेगळ्या बेड्सची योजना आखत असतील तर त्यांचे स्वतःचे अंदाज आणि त्याप्रमाणे वाढ दर्शवली गेली पाहिजे, असं ते म्हणालेत. 
 
दरम्यान, पालिकेनं धारावीतील मनोहर जोशी शाळा देखील 600 बेड्सच्या आयशोलेशनसाठी घेतली आहे. जी-उत्तर वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, आम्ही 137 रुग्णांना तिथे हलवलं आहे आणि ते थोडे ठिक झाल्यानंतर त्यांना माहिम नेचर पार्कमध्ये हलवण्यात येईल. आतापर्यंत धारावीमध्ये 632 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

BMC is working on making more isolation centers read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.