मुंबई : मिस्टर इंडियाचा किताब पटकावणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटील याने अभिनेता साहिल खान याच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घालावं यासाठी मनोजचे आई-वडील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.
मनोज पाटील याच्यावर सध्या मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तत्पूर्वी त्याने ओशिवरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना लेखी पत्र लिहून साहिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये बदनामीला कंटाळून आपण आत्महत्येचा पाऊल उचलत असल्याचं त्यानं पत्रात म्हटलं होतं. मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मनोज मिस्टर ऑलिंपियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानला सुद्धा या स्पर्धेत उतरायचे होते. मी स्पर्धेत उतरु नये, यासाठी साहिल खान आपल्याला त्रास देत होता, असा आरोप मनोजने केला आहे. १९९२ साली जन्मलेल्या मनोजने २०१६ मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता.
मनोज पाटीलचे कुटुंब राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. राज ठाकरे यांची भेट घेऊन ते मदतीची मागणी करणार असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. त्यानुसार, मनोजचे कुटुंबिय आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत.
साहिल खाननं मांडली आपली बाजू
दरम्यान, या प्रकरणी साहिल खानने दोन दिवसांपूर्वी आपली बाजू मांडताना म्हटलं होतं की, आपण या प्रकरणात पुराव्यानीशी सर्व गोष्टी समोर आणणार आहोत. "मनोज पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात माझे नाव घेण्यात आले आहे आणि म्हणूनच मला आज माझी बाजू समोर आणायची आहे. मला पुराव्यासह सत्य आणि खरं कारण सांगायचं आहे. त्यानंतर जर माझं स्पष्टीकरण आणि पुरावे पुरेसे नाहीत, असं कोणाला वाटतं असेल तर मी कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जायला तयार आहे. पण जर मी निर्दोष असेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.