24 तासांत तीन गुन्हे दाखल, गुन्ह्यांची संख्या सातवर
भोईवाडा, बांगूरनगर व बोरीवली येथे गुन्हे दाखल
मुंबई: बोगस लसीकरणाप्रकरणी टोळीला मदत केल्याच्या आरोपाखाली कांदिवली पोलिसांनी रुग्णालयाच्या मालक व त्याच्या पत्नीला गुरूवारी अटक केली. या प्रकरणी 24 तासांत बोरीवली, बांगूरनगर व भोईवाडा येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बनावट लसीकरणाची गुन्ह्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. कांदिवली बोगस लस प्रकरणात आरोपींना लस पुरवण्यात मदत केल्याचा आरोपाखाली एका रुग्णालयाच्या मालकाला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. हा मालक डॉक्टर असून त्याच्या पत्नीलाही या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. (Bogus Vaccination Scam in Mumbai Hospital Owner and his wife arrested Complaint lodged at Borivali)
बोगस लसीकरणाप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी सहावा गुन्हा दाखल केला आहेत. कांदिवलीमधील आरोपींशी संबंधीत गटानेच ही लसीकरण केले होते. त्या अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेच्या 40 कर्मचा-यांना एप्रिल व मे महिन्यात लस देण्यात आली होती. त्याप्रकरणी महेंद्र सिंग मनी त्रिपाठी, करीम अली, संजय गुप्ता व दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय बोरीवलीमध्येही 514 जणांना बोगस लस दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा याप्रकरणातील सातवा गुन्हा आहे. याप्रकरणी श्रीकांत माने, सीमा अहुजा, यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीसाठी लसीकरणा आयोजीत केले होते. त्यासोबत महिंद्र सिंग याचाही सभाग आहे. याप्रकरणीही अटक आरोपीच्या रुग्णालयाने मदत केल्याचा संशय आहे. याशिवाय याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.