बोगस लसीकरणाचा डोस बॉलिवूडलाही; टिप्स कंपनीची फसवणूक?

30 मेपासून ते 3 जूनपर्यंत राबवण्यात आली होती लसीकरण मोहिम
बोगस लसीकरणाचा डोस बॉलिवूडलाही; टिप्स कंपनीची फसवणूक?
Updated on

30 मेपासून ते 3 जूनपर्यंत राबवण्यात आली होती लसीकरण मोहिम

मुंबई: कोरोना रोखण्याासाठी देशांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र या लसीकरण मोहिमेत लशींचे डोस देणाऱ्या काही संस्था बनावट असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत बोगस लसीकरण घोटाळे होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकतंच कांदिवलीत हिरानंदानी इस्टेटमध्ये बोगस लसीकरण घोटाळा उघड झाला. ही घटना ताजी असतानाच बॉलिवूडमध्येही कोरोना बोगस लसीकरणाचे डोस दिले गेले असल्याची माहिती मिळत आहे. बॅालिवूड निर्माता आणि टीप्स कंपनीचे सर्वेसर्वा रमेश तोरानी यांनी त्यांच्या टीप्स कंपनीत राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. (Bollywood Film Producer Tips Company Owner Ramesh Taurani says Tips duped in Mumbai fake vaccine scam Still waiting for certificate)

बोगस लसीकरणाचा डोस बॉलिवूडलाही; टिप्स कंपनीची फसवणूक?
भन्नाट योगायोग! एका चहामुळे पोलिसांना सापडली बेपत्ता मुलगी

रमेश तौरानी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले,माझ्या टीप्स कंपनीच्या तब्बल 365 कर्मचाऱ्यांचे लसीकरण 30 मे आणि 3 जून रोजी करण्यात आले होते.मात्र,अद्यापही त्या कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे लसीकरण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले नाहिये.आम्ही सर्व कोरोना लसीकरण दाखले मिळण्याच्या अजूनही प्रतिक्षेत आहोत.'एस पी इव्हेंट्स'च्या संजय गुप्ता यांना माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईच्या कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॅास्पिटलमधून 12 जूनला तुम्हाला लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचं सांगितलं.मात्र,माझ्या कंपनीतील 365 जणांना देण्यात आलेली कोरोना लस अधिकृत आहे का नाही?आम्हाला कोव्हिशिल्ड लस दिली की सलाईन वॉटर? असे अनेक प्रश्न आम्हाला भेडसावत असून आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत. 365 जणांना देण्यात आलेल्या लशींसाठी प्रत्येकी 1200 रुपये या लसीकरणासाठी देण्यात आल्याचे तौरानी यांनी सांगितले. नुकताच कांदीवलीत झालेला कोरोना बोगस लसीकरण घोटाळा ताजा असतानाच बॅालिवूडसह काही कंपन्यांमध्ये 'एस.पी इव्हेंट्स'च्या माध्यमातून बोगस लसीकरण होत असल्याची धक्कादायक चित्र समोर आलं आहे.'मॅचबॅाक्स पिक्चर्स' या कंपनीच्या 150 कर्मचाऱ्यांना याच कंपनीतर्फे 'कोव्हिशील्ड' लसीची पहिली मात्रा 29 मार्चला देण्यात आली होती.

बोगस लसीकरणाचा डोस बॉलिवूडलाही; टिप्स कंपनीची फसवणूक?
भाजप-शिवसेना राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पदाधिकाऱ्यांशी भेट

कांदिवलीत झालेल्या बोगस लसीकरणाप्रमाणे 'मॅचबॅाक्स पिक्चर्स' या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही 'कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॅास्पिटल'मधून प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, एका आठवड्यानंतर सर्वांना 12 जूनला लशीची पहिली मात्रा दिल्याचं प्रमाणपत्र कोकीळाबेन नव्हे, तर 'नानावटी सुपर स्पेशलिटी हॅास्पिटल'कडून देण्यात आले.'मॅचबॅाक्स पिक्चर्स'या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने एका वृत्तवाहीनीला सांगितले,आमचे लसीकरण झाले मात्र, अद्यापही प्रमाणपत्र देण्यात आलं नाहिये.आठवडाभरानंतर तुम्हाला लसीकरणाची नोंद असलेले दाखले देण्यात येतील.कंपनीची उर्वरीत कामे पूर्ण करायची आहेत.लसीकरण झाल्यानंतर आमच्यापैकी कोणालाही लसीकरणानंतरची लक्षणे जाणवली नाहीत,याची चिंता आम्हाला सतावत होती.तसंच 'मॅचबॅाक्स पिक्चर्स'चे निर्माता संजय रोत्रे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण बोगस झाले असल्याचे आरोप फेटाळले आहेत.संपूर्ण लसीकरणाची सत्यता पडताळणी केल्याशिवाय मी याविषयी कोणतेही भाष्य करणार नाही,असे रोत्रे यांनी सांगितले. 'एस.पी इव्हेंट्स'च्या माध्यमातून झालेल्या बोगल लसीकरणाचा फटका प्रसिद्ध संगितकार प्रितम यांच्यासह अनेक प्रोडक्शन कंपन्यांना बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()