Bomb Threat : मुंबईतील 50 रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; नागपूरसह 41 विमानतळांनाही धमकीचे मेल

Bomb Threat call
Bomb Threat call
Updated on

Mumbai Crime News : मुंबईमधल्या पन्नासपेक्षा जास्त रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तसेच नागपूरसह ४१ विमानतळांनादेखील अशीच धमकी मिळाली आहे. ई-मेलव्दारे धमकीचे मेल वेगवेगळ्या संस्थांना प्राप्त झाले आहेत.

मुंबईमधलं जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल यासह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या प्राप्त झाल्या आहेत. धमकीचे ईमेल VPN नेटवर्क वापरून पाठवले गेले आहेत.

रुग्णालयांसह मुंबईतील हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.

यापूर्वी दिल्लीतील हॉस्पिटल्स आणि विमानतळ उडवून देण्याच्या धमक्या प्राप्त झाल्या होत्या. परंतु पोलिस तपासात त्यात काहीही तथ्य आढळून आलेलं नव्हतं. मुंबईत रुग्णालयांना मिळालेल्या धमक्यांनंतर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे.

मुंबईसह नागपूर विमानतळदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. नागपूरसह ४१ विमानतळं उडवून देण्याच्या धमकीचे मेल मिळाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.