Mumbai News : बॉम्बे डाईंग कंपनीची २२ एकर जमीन ५ हजार २०० कोटींना विकण्याचा निर्णय

Mumbai News
Mumbai Newsesakal
Updated on

मुंबई: मुंबईमध्ये मोठ्या कंपनीने जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोठा व्यवहार दुसऱ्या एका बड्या कंपनीसोबत होतोय. तब्बल २२ एकर जमीन ५ हजार २०० कोटी रुपयांना विकण्यात येणार आहे.

मुंबईतल्या बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीने वरळीमध्ये असलेल्या २२ एकर जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विक्रीचा व्यवहार ५ हजार २०० कोटी रुपयांना होईल. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाने बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या जमिनीसोबत असलेल्या एफएसआयचीही विक्री होणार आहे. सदरील व्यवहार दोन टप्प्यांमध्ये होईल.

Mumbai News
Rain Update : उद्यापासून पावसाचा राज्यात जोर वाढण्याची शक्यता

एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार सुमितोमो रिअल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीची उपकंपनी असलेल्या गोईसू रिअल्टी प्रा. लि. या कंपनीशी होणार आहे. हीच कंपनी जमीन विकत घेणार असून यातील पहिला टप्प्यात ४ हजार ६७५ कोटी रुपयांचा व्यवहार होईल, तर उरलेले ५२५ कोटी रुपये बॉम्बे डाइंगला दुसऱ्या टप्प्यात मिळतील, ही माहिती कंपनीचे अध्यक्ष नसली वाडिया यांनी दिली.

Mumbai News
Satyajeet Tambe:ऑनलाईन तिकीट बुक करुन गळक्या बसमध्ये बसायचं का? आमदार सत्यजीत तांबेंचा एसटीला संतप्त सवाल

जमीन विक्रीचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. कंपनीकडील वापर न झालेल्या जमिनीचा विक्री करण्याचा तत्त्वतः निर्णय घेण्यात आलेला असून याद्वारे निवासी आणि व्यापारी संकुलांसाठी ३५ लाख चौरस फूट जागा विकसित करून त्यातून पढे येत्या काही वर्षांत पंधरा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.