Hijab Ban: महाविद्यालयात हिजाबबंदी कायम राहणार! हायकोर्टानं फेटाळली विद्यार्थ्यीनींची याचिका

मुंबईतील एका महाविद्यालयानं लागू केलेल्या हिजाब बंदी विरोधात काही विद्यार्थीनींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
Hijab Ban
Hijab BanEsakal
Updated on

मुंबईतील एका महाविद्यालयानं लागू केलेल्या हिजाब बंदी विरोधात काही विद्यार्थीनींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं महाविद्यालयांच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळं महाविद्यालयांमध्ये हिजाबबंदी कायम राहणार आहे. (Hijab ban will remain in chembur college Mumbai High Court rejected petition of girl students)

चेंबूर येथील महाविद्यालयाने हिजाबबंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असा मोठा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळं चेंबूरच्या ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन जी आचार्य आणि डी के मराठे महाविद्यालयांतील हिजाबबंदी कायम राहणार आहे.

Hijab Ban
Abraham Lincoln: अमेरिकेत अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला; कराचीत उष्मघाताने शेकडो बळी

याचिकेत काय म्हटलं होतं?

विद्यार्थीनींनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, हिजाबबंदी ही धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी बाब आहे. पण या याचिकेतील मुद्द्यांचं महाविद्यालयाकडून खंडन करण्यात आलं आणि यामागे महाविद्यालयाचा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं महाविद्यालयानं म्हटलं आहे.

Hijab Ban
आणीबाणीचा मास्टरमाईंड कोण? जाणून घ्या

महाविद्यालयाचा निर्णय काय?

ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पेहरावांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये हिजाब, बुरखा, स्टोल, नकाब यांचा समावेश आहे.

https://saamtv.esakal.com/video/hijab-ban-in-college-remains-high-court-rejects-petition-today-news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.