करचोरी प्रकरणी अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा; 'इन्कम टॅक्स'ला दिले महत्वाचे निर्देश

अनिल अंबानी सध्या करचोरी प्रकरणात अडकले असून त्यांच्याविरोधात आयकर विभागानं खटला दाखल केला आहे.
Anil Ambani
Anil Ambani
Updated on

मुंबई : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना ४२० कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. तसेच १७ नोव्हेंबरपर्यंत अंबानींवर कारवाई करु नये, असे निर्देशही हायकोर्टानं आयकर विभागाला दिले आहेत. (Bombay HC gives relief to Anil Ambani in an alleged tax evasion matter)

अनिल अंबानींवर दिवाळखोरीनंतर आता आणखी एक संकट ओढावलं आहे. स्विस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर त्यांनी ४२० कोटींचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याबद्दल आयकर विभागानं त्यांना नोटिस पाठवली होती.

Anil Ambani
Narayan Rane : जुहूतील राणेंच्या बंगल्यावर पडणार हातोडा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेेटाळली

अनिल अंबानी यांनी ८१४ कोटी रुपयांची मालमत्ता लपवल्याचा आरोप आहे. दोन परदेशी बँकांमध्ये त्यांनी हे पैसे ठेवले असून या रकमेवरचा ४२० कोटींचा कर चुकवला असल्याचा आरोप इन्कम टॅक्स विभागाने केला आहे. ही रक्कम बेहिशोबी अर्थात काळा पैसा असल्याचाही आयकर विभागाचा आरोप आहे.

Anil Ambani
Tanaji Sawant: आरोग्य मंत्री तानाजी सावंत जेव्हा चिडून निघून गेले...; पाहा Video

बहामास इथल्या इकाई डायमंड ट्रस्ट आणि आणखी एका व्यापारी संघटनेशी अंबानींचे व्यावसायिक संबंध आहेत. या कंपन्यांमधून आलेली रक्कम अनिल अंबानींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.