Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधरेना! हायकोर्टानं फटाके, बांधकामांबाबत घेतला मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील हवेचं प्रदुषण प्रचंड वाढलं आहे.
Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधरेना! हायकोर्टानं फटाके, बांधकामांबाबत घेतला मोठा निर्णय
Updated on

मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता ढासाळली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील हवेचं प्रदुषण प्रचंड वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर इमारतींची बांधकामं तुर्तास बंद ठेवण्याचे तसेच दिवाळीत फटाके फोडण्यावरही हायकोर्टानं निर्बंध आणले आहेत.

कोर्टाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी व्हायलाच हवी असे निर्देशही देण्यात आले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं हे निर्देश दिले. तसेच १० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. (Bombay HC Suo Motu PIL deteriorating AIR quality of Mumbai permits busting of FIRE CRACKERS only for 3 hours)

बांधकामं तुर्तास बंद करा

येत्या चार दिवसांत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही तर दिवाळीच्या काळात चार दिवस मुंबईतील बांधकामं थांबवण्यात यावेत. तसंच दिवाळीत फटाके फोडताना कोर्टाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करावं, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं प्रशासनाला दिले आहेत. (Latest Marathi News)

केवळ तीन तास फटाके फोडता येणार

हायकोर्टानं दिवाळीच्या काळात मोठे फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. केवळ तीन तास अर्थात रात्री ७ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येतील असं हायकोर्टानं म्हटलं आहे. वेळेच्या या नियमाचं काटेकोर पालनं केलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट निर्देश हायकोर्टानं प्रशासनाला दिले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधरेना! हायकोर्टानं फटाके, बांधकामांबाबत घेतला मोठा निर्णय
Chhagan Bhujbal: मागच्या दारातून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही; शिंदे समितीच्या कामकाजावर भुजबळांचा आक्षेप

हायकोर्टाचे निर्देश काय?

  1. चार दिवसांत हवा गुणवत्ता सुधारली नाही, तर मुंबईमध्ये बांधकामं करता येणार नाहीत.

  2. बांधकामांच्या साईटवरुन राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरनं ताडपत्रीनं झाकूनचं आलेगेले पाहिजेत.

  3. बांधकामाच्या साईटच्या सीमारेषेवर चारही बाजूनं पुरेशा उंचीवर लोखंडी पत्रे लावणंही गरजेचं आहे.

  4. नैसर्गिकरित्या परिस्थिती पूर्वपदावर येईल याची वाट पाहत बसू नका.

  5. मुंबईतल्या प्रदुषणाची परिस्थिती गंभीर असून ही कुणा एकाची जबाबदारी नाही. यासाठी संपूर्ण यंत्रणेनं एकत्र काम करायला पाहिजे.

  6. मुंबईत आठवडाभर आधीच सण साजरा व्हायला सुरुवात होते.

  7. फटाक्यांवर बंदी घालण्याची कोर्टाची इच्छा नाही. पण मोठे फटाके रात्री ७ ते १० मध्येच फोडता येतील.

  8. मुख्य सचिव, एमएमआरडीए, वाहतूक विभाग, मुंबई पोलीस आयुक्त हे सर्वजण जनहित याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.