मुंबई: कोविडच्या युद्धात आपण सगळे सहभागी होतो. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात केली असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे. तसंच फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणालाही पालिकेकडून सुरुवात केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तीन लाख 60 हजार वर्कर्स फ्रंटलाईन आणि हेल्थकेअरचे मिळून कर्मचारी असून २१ सेंटरमध्ये लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहितीही काकाणी यांनी दिली आहे.
सध्या मुंबईत लसीकरणासाटी ११४ युनिट कार्यरत आहे. पहिला सुरु आहे आणि दुसरा टप्पा सोबतच सुरु करत असल्याचंही ते म्हणालेत.
हेल्थकेअर बऱ्या प्रमाणात कव्हर झालेत. दुसऱ्यात फ्रंटलाईन कव्हर एक महिन्यात करायचा आहे. तसंच मुंबईत लशीसंदर्भात कोणतीही तक्रार आली नसल्याचही त्यांनी सांगितलं. मुंबईसह महाराष्ट्रात अजून दुष्परिणाम नसल्याचंही ते म्हणालेत.
2 लाख 65 हजार लशींचासाठा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणखीही साठा केंद्र सरकार आपल्याला देणार असून लशींची उपलब्धता आहे असंही काकाणी यांनी सांगितलं.
लोकल सुरू झाल्यानंतर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आणखी 15 दिवस सतर्क राहणार आहोत. त्यासोबतच 31 तारखेपर्यंत कोविड केअर सेंटर सुरू ठेवलेत. अद्याप संख्येत अधिकवाढ झालेली नाही. सगळ्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही काकाणी यांनी नागरिकांना केलं आहे.
लोकल सर्वांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं सांगत टप्याटप्याने लोकल सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
15 दिवसांपूर्वी आढावा घेतला आहे. लोकल सुरु झाल्यात. सगळ्या गोष्टींचा विचार करून अजूनशाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही . MMR परिसराचा विचार करून निर्णय घेऊ. दर आठवड्याला आढावा घेत आहोत. एक एक क्षेत्र हळूहळू सुरू करतोय, असंही त्यांनी सांगितलं.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत एका रुग्णालयात चाचण्या आपण करत आहोत. जन्माला आलेल्या नवजातशिशूच्या प्रतिजैविकाबाबत तपासण्या केल्या जात आहेत. लसीकरण 18 वर्षावरील लोकांनाच द्यायच्या आहेत. प्रक्रिया सुरु केलीय, कालावधी देणार आहोत, धोकादायक अवस्था दुरुस्त केली नाही तर नियमांनुसार कडक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
31 मार्चपर्यंत सज्जता कायम ठेवणार आहोत. रुग्ण संख्या वाढल्या नाहीत तर कोविड सेंटरसाठी घेतलेल्या त्या त्या आस्थापनांना इमारती परत करण्याचा निर्णय घेऊ. लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत आणि शाळा सुरू करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. आम्ही दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेतोय . सकारात्मकता दिसल्यास निर्णय घेऊ, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
---------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
bombay Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani on local railway school
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.