मुंबई: मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे. त्याचबरोबर कोरोनावरील तीन लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये सज्ज झाली आहेत. पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर, सायन आणि कूपरसह राजावाडी रुग्णालयात लसीकरणाची तयारी अगदी अंतिम टप्प्यात असून लस उपलब्ध झाल्यास तात्काळ लसीकरणाला सुरुवात केली जाईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शनिवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (आरोग्य) यांनी प्रमुख लसीकरण केंद्रांची भेट घेतली. त्यानुसार, लसीकरणासाठी निवडण्यात आलेली केंद्रे पूर्ण तयारीनीशी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर 10 ब्लॉक्स तयार करण्यात आले आहे. जिथे एका वेळेस 10 लोकांना लसीकरण केले जाईल. कोल्ड स्टोरेजमध्ये 12 हजारांहून अधिक डोस साठवता येतील. लसीकरणानंतर जर कोणाला गंभीर परिणाम जाणवला तर आयसीयूचे दोन बेड्स आणि सौम्य परिणाम जाणवणाऱ्यांसाठी 8 बेड्सची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय, चार सल्लागार डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून पल्मनोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि फिजीशियन यांची टीम देखील सज्ज आहे.
किमान एका तासाला 160 जणांना लसीकरणाचा प्रयत्न असणार आहे. म्हणजेच दिवसभरात किमान 2000 लसीकरणाचा टप्पा गाठणार आहोत. शिवाय, सुरक्षारक्षकांना सज्ज राहायले सांगितले आहे. डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. या सर्वांचा डेटा नोंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्वांसाठी सज्ज आहोत असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
लस साठवण्यासाठी 225 लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटरची सुविधा ज्यात किमान 48 हजार लसीच्या डोस साठवता येतील. डॉक्टर्स आणि नर्सेस लसीकरण करणार आहेत. आपातकालीन विभागाच्या बाजूला बूथ तयार करण्यात येत आहे. असे 8 ब्लॉक्स तयार केले जातील. शिवाय, जर जास्त गर्दी झाली तर आणखी दोन ब्लॉक्स तयार केली जाईल. लसीकरणाचा परिणाम काही जाणवला तर तात्काळ त्यांच्या उपचारांसाठी आपत्कालीन विभाग सज्ज आहे. वॅक्सिन कॅरिअर, थर्मोगन, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी लागणारे मटेरिअल ही पालिकेकडून मागवण्यात आले आहेत. प्रतिक्षा करण्याची सोय वेगळी करण्यात आली आहे. सायन रुग्णालयाच्या अंतर्गत एल वॉर्ड, एन पश्चिम, एम पूर्व, एस दक्षिण या परिसरातील हेल्थ केअर वर्कस येतात. त्यामुळे गर्दी वाढू शकते. त्यासाठी कोविन अॅपवर नोंद झालेल्या हेल्थकेअर वर्कस ची पूर्वतपासणी आणि त्याच्या माहितीची संपूर्ण पडताळणी केली जाईल. गुरुवारपर्यंत संपूर्ण तयारी झालेली असेल.
डॉ. सीमा बन्सोडे, नोडल अधिकारी, कोविड लसीकरण सायन रुग्णालय
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील कर्मचारी कोविड लसीकरणासाठी सज्ज झाले आहेत. राजावाडी रूग्णालयातील नर्स तसेच नव्याने भरती होणाऱ्या डॉक्टर्स, विद्यार्थ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणासाठी मुंबईत जवळपास 75 सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सेंटर हे दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. कोरोना लस ही पहिल्यांदा डॉक्टर, नर्स, कोरोनायोद्धा आणि वृद्धांना दिली जाणार आहे. लसीचा डोस साठवण्यासाठी आयएलआर आलेला आहे. या आठवड्यापर्यंत संपूर्ण तयारी होऊन जाईल अशी माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.
सुरुवातीला लसीकरणासाठी केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही 8 लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार या प्रत्येक केंद्राने 3 ते 5 आदर्श लसीकरण स्थळं निर्देशित करावयाची आहेत.
प्रमुख रुग्णालयात दिवसाला 2 हजार लसीकरणाचा प्रयत्न-
महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ही पुर्ण तयारी झाली असून सगळे लॉजिस्टिक, जागा तयार केल्या आहेत, नॅशनल प्रोटोकॉलप्रमाणे 4 प्रमुख वैद्यकीय कॉलेजेस आणि 4 उपनगरीय रुग्णालयात तयारी केली गेली आहे. त्यामध्ये निरिक्षण रुम, 10 व्हॅक्सिनेशन काउंटर आणि एक वेटिंग रूम असणार आणि प्रत्येक युनिट ला ५-५ जणांचं पथक, त्यात सिक्युरिटी असणार वॅक्सीनेटरला सपोर्ट करणारी एक व्यक्ती, डेटा एन्ट्री ऑपरेटर, इमरजेंसी सिस्टम असणार आणि सर्व ऑबसेर्वेशन केलं जाईल. 2 आयसीयुबेड, व्हेंटिलेटर, ऑक्सीजन ठेवलेलं आहे. मेडिसिन पलमनोलॉजी, ऍनेस्थेशिया आणि न्यूरॉलॉजी ह्याचे डॉक्टर तिकडे तैनात ठेवले जातील. दिवसाला पर युनिट 100 आणि प्रमुख रुग्णालयांमध्ये 2000 लोकांना लसीकरण करण्याचा प्रयत्न असणार आहे असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
---------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
bombay Municipal Corporation major hospitals ready for corona vaccination
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.