मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. या मेसेजमुळं मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हा मेसेज कोणी पाठवला हे अद्याप कळू शकलेलं नाही, पण पोलीस याचा शोध घेत आहेत. (bombs have been placed at six locations across mumbai traffic police control room receives a threat message)
एएनआयच्या ट्विटनुसार, मुंबई वाहतूक पोलीस कन्ट्रोल रुमला हा धमकीचा मेसेज आला आहे. एका अनोळखी व्यक्तीनं हा मेसेज पाठवला असून हा व्यक्ती कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. (Marathi Tajya Batmya)
मेसेजमध्ये काय म्हटलंय?
मुंबईतील विविध सहा ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. हा मेसेज गांभीर्यानं घेत पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मेसेज करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.