Boot Polish Tender Scam: पश्चिम रेल्वेचा शहाणपणा मध्यरेल्वेला का सुचला नाही!

Boot Polish Tender Scam
Boot Polish Tender Scamsakal
Updated on

नितीन बिनेकर

मध्यरेल्वे प्रमाणे पश्चिम रेल्वेने बूट पॉलिश व्यवसायाचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या निर्णयाला खासदार गोपाळ शेट्टी यांनी विरोध केला होता. त्यांच्या पत्रानंतर पश्चिम रेल्वेने या निर्णय मागे घेतला.

मात्र मध्य रेल्वेला हे शहाणपणा का दाखवता आला नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या प्रकरणी लक्ष घालणार आहे. अशे गोपाळ शेट्टी यांनी सकाळसोबत बोलताना सांगितले आहे.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी २८ फेब्रुवारी 2023 ला पश्चिम रेल्वेच्या महाव्यस्थापकांना पत्र लिहून रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्या गरीब कामगारांचे कुटूंब या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे कंत्राटीकरण करून बूट पॉलिशवाले बेरोजगार होणार नाहीत याची काळजी घ्या सांगितले होते. २ मार्च २०२३ रोजी पश्चिम रेल्वेने खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पत्राला उत्तर देत म्हटले की, बूट पॉलिश कामगारांच्या समस्यासह टेंडर संदर्भात अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहे. या अभ्यासानंतर १५ दिवसांत टेंडर प्रक्रियेला पश्चिम रेल्वेने स्थगिती दिली.

Boot Polish Tender Scam
Railway News: रेल्वेची आठ तासात १२०० फुकट्यांवर कारवाई

मध्य रेल्वेने टेंडर काढले-

दुसरीकडे मध्यरेल्वेच्या बूट पॉलिश स्टालच्या निविदाना काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या पत्रांना मध्यरेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

या कंत्राटीकरणाच्या घोळामुले ठाणे रेल्वे स्थानकावरील वर्षांनुवर्षे काम करणारे बूट पॉलिश कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रमाणे मध्यरेल्वे प्रशासनाने हा निर्णय का मागे घेतला नाही. कि कंत्राटदाराचा फायदासाठी हा निर्णय घेतला गेला असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.

Boot Polish Tender Scam
Railway News: हिवाळ्या निमित्त मुंबईच्या दिशेने धावणार विशेष रेल्वे गाड्या

पश्चिम रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांप्रमाणे आम्ही मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांना न्याय मिळवून देऊ, त्यांना होईल तेवढी मदत आम्ही करू.

- गोपाळ शेट्टी,खासदार

आंदोलन छेडणार !

या संदर्भात स्वतः रेल्वे राज्य मंत्री यांच्याशी पाठपुरावा करून चर्चा केली होती.त्यांनी कामगारांना न्याय देण्याची ग्वाही दिली होती.या संदर्भात पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. तरीही बूट पॉलिश कामगारांचे अडचण मिटणार नसेल तर आंदोलन छेडणार.

- भीमेश मुतुला, सचिव, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना

Boot Polish Tender Scam
Digha Railway Station: दिघागाव रेल्वे स्थानकाला 12 जानेवारीचा मुहूर्त; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उदघाटन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.