"रेल्वे क्राॅसिंग'च्या कसरतीला ब्रेक!

File Photo
File Photo
Updated on

कळवा : खारेगावहून कळवा पूर्वला जाण्यासाठी उड्डाणपूल उभारणीचा निर्णय घेऊन ठाणे महानगरपालिकेने रेल्वे फाटकावर गेली काही दशके तासन्‌ तास खोळंबून राहणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिल्यानंतर आता उड्डाणपुलाला समांतर पादचारी पुलाला मंजुरी देऊन परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या रेल्वे रूळ ओलांडण्याच्या कसरतीलाही ब्रेक दिला आहे.

सध्या या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या पुलाच्या कामानंतर सदरची "रेल्वे लेव्हल क्रॉसिंग' पूर्णपणे बंद केली जाणार असल्याने कळवा पूर्व व खारेगाव व पारसिक नगरमधील कळवा रेल्वेस्थानकात पायी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना व भास्करनगर, पौंडपाडामधील नागरिकांना खारेगावात येताना रेल्वे रूळ ओलांडून येण्याशिवाय भविष्यात पर्याय नव्हता.

याआधी रेल्वे रूळ ओलांडताना अनेकदा अपघातही झाले आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी खारेगावमधील स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी या रेल्वे फाटकावरून बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाला समांतर "पादचारी' पूल होण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याला आता यश आले असून ठाणे महापालिका प्रशासनाने या पादचारी पुलाला मंजुरी दिली आहे. 

सध्या खारेगाव पारसिकनगर, खारेगाव पूर्व येथे अनेक मोठे-मोठे हाऊसिंग कॉम्प्लेक्‍स उभे राहत असल्याने या परिसरातील लोकसंख्या तीन ते चार लाख झाली आहे. भविष्यात रस्ता ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा पूल वरदान ठरणार आहे. या पुलामुळे येथील भाग विकसित होऊन खारीगाव पूर्व व पश्‍चिम हा भाग जोडला जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

कामासाठी 10.42 कोटींचा खर्च 
हा पादचारी पूल 250 लांबीचा व 3.50 मी रुंदीचा असून जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खारेगाव नाक्‍याकडील बाजूस एक जिना व शिवसेना शाखेसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूस एकेक जिना याप्रमाणे तीन जिने बांधले जाणार आहेत. या कामासाठी 10 कोटी 42 लाख 34 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. विशेष म्हणजे या "स्कायवॉक'च्या कामाकरिता ठाणे रेल्वेस्थानक पूर्वेकडील बाजूस "एमएमआरडीए'ने बांधलेल्या ठाणे सॅटीस (पूर्व)च्या कामात बाधित होत असल्यामुळे तो निष्कसित केला जाणार आहे. त्यामुळे त्या "स्कायवॉक'च्या सांगाड्याचा उपयोग येथे केला जाणार आहे. त्यामुळे काही खर्चाचीही बचत होणार आहे. 

या नियोजित पादचारी पुलाचा खारेगाव, पारसिकनगर व कळवा पूर्व येथील नागरिकांना उपयोग होणार असल्याने तो लवकरात लवकर पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. 
- उमेश पाटील,
नगरसेवक, खारेगाव 

हा पादचारी पूल झाल्यास रेल्वे अपघात कमी होऊन त्याचा फायदा प्रवाशांसह परिसरातील सर्व नागरिकांना होणार आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण करावे. 
- योगिता पाटील,
रहिवासी, खारेगाव 

Break to action of railway crossing!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.