Breaking | राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी; विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना जारी

Breaking | राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी; विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना जारी
Updated on

मुंबई - राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत महत्वाचा निर्णय उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वर्गातील विद्यार्थी संख्येच्या 50 टक्के उपस्थितीसह  रोटेशन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

कोरोना काळानंतर राज्यातील महाविद्यालये आता टप्याटप्याने उघडण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्यापिठांची भूमिका महत्वाची आहे. वर्गातील बाकांची किंवा विद्यार्थी संख्या लक्षात घेता त्यापैकी 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह रोटेशन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. 15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबत 15 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत हा पहिला  टप्पा असेल. व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महाविद्यालये पुर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालये सुरू करताना विद्यापिठ अनुदान आयोगाने ( university grant commission ugc ) काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत.

  • जिल्हाधिकाऱ्यांना महाविद्यालयांनी आपल्या पायभूत सुविधांबाबत माहिती द्यायला हवी. 
  • जिल्हाधिकाऱ्यांनी कोव्हिडचा प्रभाव आपल्या जिल्ह्यामध्ये किती आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी.
  • प्रवेश, अभ्यासक्रम पुर्ण करणे, मुल्यमापन, निकाल जाहीर करणे, त्याबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करणे
  • महाविद्यालयात, शारिरीक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे हे नियम काटाक्षाने पाळावेत
  • कोणत्याही गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यास विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महाविद्यालयांसदर्भात पुढील निर्णय घ्यावेत.

वसतीगृहांचा प्रश्न?

 राज्य सरकारने राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद साधल्यानंतर विद्यापीठांना वसतीगृह टप्याटप्याने सुरू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु 15 फेब्रुवारीला फक्त महाविद्यालये सुरू होतील. असा निर्णय सरकारने घेतला आहे. वसतीगृह सुरू करताना, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या परिक्षा

राज्य सरकारने विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत घेतलेल्या बैठकीत असाही निर्णय घेण्यात आला की, विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात की ऑफलाईन घ्याव्यात याचा निर्णय विद्यापीठांनी घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या सोईच्या दृष्टीने विद्यापीठांनी हा निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सरकाने म्हटले आहे.

उपस्थिती बाबत

महाविद्यालये 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार असली तरी, 75 टक्के उपस्थितीचा नियम बाद करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठांना दिली आहे. 

---------------------------------------

Breaking maharashtra college reopen Permission granted by uday samant marathi latest news education

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.