Police Recruitment : पोलिस भरतीत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच

जिल्‍हा रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यावर गुन्हा; १५ उमेदवारांकडून २१ हजाराची वसुली
Bribe for medical certificate police recruitment Crime against employee of District Hospital
Bribe for medical certificate police recruitment Crime against employee of District Hospital esakal
Updated on

अलिबाग : भावी पोलिसांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खंडणीची मागणी करणे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस भरतीची अंतिम प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून त्यात निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी दहा मेपासून सुरू झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ही वैद्यकीय तपासणी केली जाते, मात्र कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्याने अंतिम वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी धमकी देण्यात आली. वैद्यकीय प्रमाणपत्राविना अपात्र ठरण्याची भीती महिला उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.

Bribe for medical certificate police recruitment Crime against employee of District Hospital
Mumbai Crime: चांगला सल्ला देणे पडलं महागात ! मित्राने चिडून केला चाकू हल्ला

जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉयच्या मदतीने कर्मचारी प्रदीप ढोबाळ याने अंतिम वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी १५ उमेदवाराकडून २१ हजार पाचशे रुपयांची खंडणी वसूल केली. ही बाब पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत महिला उमेदवारांशी संपर्क साधून संबंधित घटनेची पडताळणी केली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक निरीक्षक दत्तात्रेय जाधव अधिक तपास करीत आहेत.

Bribe for medical certificate police recruitment Crime against employee of District Hospital
हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी बनावट तिकीट काढून विमानतळात प्रवेश! CISFने आवळल्या मुसक्या | Mumbai Airport

जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचार फोफावत असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील व अन्य रुग्णालयातील परिचारिकांना सेवेत कायम करण्यासाठी रुग्णालयातील पवार नामक ब्रदर्सने लाखो रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. तसेच शासकीय वैद्यकीय विद्यालयात भरती करण्यासाठी लाखोंची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Bribe for medical certificate police recruitment Crime against employee of District Hospital
Pune Crime : चोरीच्या गुन्ह्यात अटक; फरासखाना पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये संपवले जीवन

पोलिस भरतीमध्ये २७८ उमेदवारांची निवड झाली आहे. या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. १४ महिला उमेदवारांकडून अंतिम वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खंडणी मागणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.