समृद्धी महामार्गावरील 'या' दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला भले मोठे भगदाड; भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता!

समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने सध्या कुठलाही पर्यायी मार्ग न बनवल्याने स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg
Mumbai-Nagpur Samruddhi Mahamargesakal
Updated on
Summary

महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते व ब्रिज बसविण्यात आले आहेत. त्यातीलच हा पूल असून रस्त्याला भगदाड पडल्याने इतर पुलांचे भवितव्य काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

खर्डी (ठाणे) : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील (Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg) शहापूर जवळील दोन गावांना जोडणाऱ्या वासिंद-आंबरजे येथील पुलाला भले मोठे भगदाड पडल्याने समृद्धी महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पर्यायी रस्ता नसल्याने पुलाच्या चांगल्या बाजूच्या मार्गाने वाहनांची रहदारी सुरू असल्यामुळे लगतचा भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला (Samruddhi Mahamarg) कोणतीही बाधा येऊ नये, म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगळे रस्ते व ब्रिज बसविण्यात आले आहेत. त्यातीलच हा पूल असून रस्त्याला भगदाड पडल्याने इतर पुलांचे भवितव्य काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg
Refinery Project : 'नारायण राणे यांच्यापासून आमच्या जीवाला धोका, आमचं रक्षण करा'; राऊतांनी व्यक्त केली भीती

शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे - बावघर - शेंद्रुण या गावांना वासिंदकडून ये-जा करण्यासाठी समृद्धी महामार्गावर हा पूल बनविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ह्या पुलाच्या रस्त्यावर मोठे भगदाड पडले. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून शेरे, आंबरजे, शेंदरून व इतर गावाकडे ये-जा करणारी वाहतूकपूर्णपणे बंद करण्यात आली.

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg
विशिष्‍ट प्रकारचं औषध घेतल्यानंतर मुलगीऐवजी 'मुलगा'च पोटी जन्म घेणार? चुकीच्या प्रचाराला पडताहेत अनेकजण बळी

दरम्यान, वाहन चालकांना वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने सध्या कुठलाही पर्यायी मार्ग न बनवल्याने स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच महामार्गाची पडझड सुरू झाली आहे, तर महामार्ग सुरू झाले तर भविष्यात मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही!

"ह्या पुलावरील रस्त्याला भगदाड पडल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने त्या भगदाडा जवळूनच वाहन जीव मुठीत घेऊन चालवत न्यावे लागत असल्यामुळे ह्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.''

-विकास डोंगरे, स्थानिक वाहन चालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com