Raju Shetti बाबत कोर्टानं घेतला मोठा निर्णय; 'या' प्रकरणातून शेट्टींसह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

मुंबई पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.
Raju Shetti
Raju Shettiesakal
Updated on
Summary

७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचा निषेध करून आंदोलन केले होते.

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह २१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गिरगाव न्यायालयाने (Girgaon Court) सोमवारी (ता.२६) निर्दोष मुक्तता केली.

७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचा निषेध करून आंदोलन केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनावर तूर, कांदा,कापूस व दूध या पिकांना हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

Raju Shetti
Solapur : महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? दहा पदाधिकाऱ्यांच्या निवडी, जातीय समिकरणाची जुळवाजुळव

यावेळी या आंदोलनामध्ये विधानभवनावरती तूर, दूध,कांदा व कापूस फेकून सरकारचा निषेध करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.

Raju Shetti
मोठी बातमी! कर्मचारी मारहाण प्रकरण भोवलं; आमदार परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा, चार जण अटकेत

काल गिरगाव कोर्टात या गुन्ह्यातून सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. सहा वर्षानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतीश भैय्या काकडे, प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, रवी मोरे, हंसराज बडगुले, प्रकाश बालवडकर, अमर कदम,जे.पी. परदेशी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज अॅड. संदीप कोरेगांवे व ॲड. प्रवीण मेंगाने यांनी विनामूल्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()