दोन घरांचे एक घर केल्यास मेंटेनन्सची दोन बिले द्या, उपनिबंधकांचा आदेश

buildings in mumbai
buildings in mumbaisakal media
Updated on

मुंबई : बिल्डरने (builder) नव्या इमारतीत 2 बीएचके आणि 1 बीएचके ची दोन वेगळी घरे बांधून नंतर ती थ्रीबीएचके (3 bhk flat) म्हणून एकत्रित विकली असली तरी प्रत्यक्षात ती दोन वेगवेगळी घरे (different flats) असल्याचा निकाल सहकार उपनिबंधकांनी (deputy registrar) दिला आहे. त्यामुळे सोसायटीने (society) या दोन घरांना दोन वेगवेगळी मेंटेनन्सची बिले (maintenance bill) द्यावीत, असाही आदेश त्यांनी दिला आहे.

सहकारी संस्थांच्या आर दक्षिण प्रभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कोठावळे यांनी नुकताच कांदिवलीच्या (पश्चिम) आरएनए रॉयल पार्क इमारतीसंदर्भात हा आदेश दिला आहे. लहान घरे असलेल्या अमिताभ अरोरा व अन्य सदस्यांनी याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. थ्रीबीएचके च्या घरांना सोसायटी एकच मेंटेनन्स बिल देते. प्रत्यक्षात दोन घरे एकत्रित करून थ्रीबीएचके बांधल्याने त्यांना मेंटेनन्सची दोन बिले दिली पाहिजेत, असे अर्जदारांचे म्हणणे होते, उपनिबंधकांनी ते मान्य केले.

buildings in mumbai
MUMBAI : मेट्रो-3 प्रकल्पाचे 97 टक्के भुयारीकरण पूर्ण

थ्रीबीएचके घरे ही प्रत्यक्षात टूबीएचके आणि वनबीएचके अशी दोन घरे वेगवेगळी बांधून ती नंतर एकत्र केली होती. बिल्डरने त्याची नोंदणीही दोन-दोन वेगवेगळ्या घरांची केली होती. त्यानुसार त्यांची दोन वेगवेगळी नोंदणीकृत खरेदीखते होती. सोसायटीनेही त्या दोन वेगवेगळ्या घरांची दोन वेगवेगळी शेअर सर्टीफिकेट दिली होती. सोसायटीच्या नोंदणीत त्या दोन घरांचे दोन वेगवेगळे सदस्य दाखवले होते. ते दोघेही जनरल बॉडी मिटिंगला हजर रहात व मतदानही दोघेजण करीत असत. त्या दोनही घरांना दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे, दोन वेगवेगळी स्वयंपाकघरे-न्हाणीघरे-स्वच्छतागृहे होती. त्यामुळे त्या दोनही घरांना स्वतंत्र सेवासुविधा मिळत असल्याने त्यांना दोन मेंटेनन्स बिले द्यावीत, अशी अर्जदारांची मागणी होती. मात्र सोसायटीने ती अमान्य केल्याने हा वाद उद्भवला.

बिल्डरच्या माहितीपुस्तकानुसारही थ्रीबीएचके म्हणजे प्रत्यक्षात दोन वेगवेगळी घरे होती (त्यांच्यात फक्त मधली भिंत नव्हती). ही बाब घरे घेतेवेळीच सर्वांना ठाऊक होती. सुरुवातीला थ्रीबीएचके सदनिकाधारकांनी बिल्डरला वार्षिक सेवाशुल्कही दोन घरांचे वेगवेगळे दिले होते, असेही अर्जदारांनी दाखवून दिले. तर या घरांचा विजेचा मीटर एकच असून पालिकेचे मालमत्ता कराचे बिलही एकच येते. बिल्डरने त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी दोन घरांची वेगवेगळी नोंद केली, असे सोसायटीने सांगितले. मात्र उपनिबंधकांनी सोसायटीचा दावा फेटाळला, थ्रीबीएचके सदनिका हे एकच घर नसून दोन घरे असल्याने त्यांना त्यानुसार मेंटेनन्सची दोन बिले द्या, असा आदेश त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()