Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी पूर्णा नदीवर ३६० मीटर रेल्वेपूल तयार! मार्गावर एकूण २४ पूल

Bullet Train
Bullet Train
Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आतापर्यंत २०० किलोमीटर मार्गावर खांब उभारण्यात आले आहेत. तर ६४ किमीपेक्षा जास्त मार्गासाठी गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरने माहिती दिली की, सुरत-नवसारी सेक्शनमधील नवसारीत येणाऱ्या पूर्णा नदीवर हायस्पीड रेल्वे पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Bullet Train
Chitra Wagh-Supriya Sule : बलात्कार की तरुणीशी शारीरिक लगट? पण राजकारण तापलं

बुलेट ट्रेनचा हा दुसरा नदी पूल असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी २० जानेवारी २०२३ रोजी वापी आणि बिलीमोरा दरम्यान पार नदीवर ३२० मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला होता.

हायस्पीड मार्गावर २४ नदी पूल बांधले जातील

नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडॉर लिमिटेड (NHSRCL) ने माहिती दिली की, अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड रेल कॉरिडॉरमध्ये एकूण २४ नदी पूल आहेत. त्यापैकी २० गुजरातमध्ये आणि ४ महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहेत. भरुच जिल्ह्यातील नर्मदा नदीवर १.२ किमी लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा हा सर्वात लांब नदीवरील पूल असेल. साबरमती, माही, नर्मदा, तापी आणि इतर नद्यांवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे.

पूर्णा नदीवरील पुलाचे वैशिष्ट्य

पुलाची लांबी ३६० मीटर असून ०९ फुल स्पॅन बॉक्स गर्डर बसविण्यात आले आहेत. ज्याची प्रत्येकी लांबी ४० मीटर इतकी आहे. १ पिअरची लांबी १०-२० मीटर इतकी आहे. यावर ४ ते ५ मीटर व्यासाचा १ खांब आहे. १५ दिवस हाय टाइड काळात नदीच्या पाणीपातळीत ५ ते ६ मीटर वाढ असायची त्यामुळे याकाळात पायाभूत काम करणे आव्हानात्मक होते.

नर्मदा : कॉरिडॉरचा सर्वात लांब पूल

अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधील ५०८ किमी लांबीचा रेल्वे पूल भरूच येथे नर्मदा नदीवर बांधला जात आहे. भरुच जिल्ह्यातील नर्मदा नदीवरील या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षात ते पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Bullet Train
Chandrakant Patil : मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या निर्णयाने चंद्रकांत पाटलांना दुःख, पत्र लिहीत केली 'ही' मागणी

तापी : दुसरा सर्वात लांब पूल असेल

हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा दुसरा सर्वात लांब पूल सुरतमध्ये बांधला जात आहे. तापी नदीवर हा पूल बांधला जात आहे. त्याची लांबी ७२० मीटर निश्चित करण्यात आली आहे. त्याची निर्मिती सुरू झाली आहे. पायाभरणीचे काम आणि तापी नदीवरील पुलासाठी पिलरचा प्रारंभिक टप्पा आता दिसत आहे. या पुलाची लांबी ७२० मीटर आहे. हा पूल २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

माही : ७२० मी. लांबीच्या पुलाचे काम सुरू आहे

मही नदीवर ७२० मीटर लांबीचा पूलही बांधला जात आहे. त्याची रुंदी ६० मीटर आहे. अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या नदीवरील पुलांचे बांधकाम आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()