अँटिलिया स्फोटक प्रकरण, लातूरमधून अटक

एक महत्त्वाची अपडेट
अँटिलिया स्फोटक प्रकरण, लातूरमधून अटक
Updated on

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील (antilia car bomb case) कार बॉम्ब स्फोटक प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एनआयएने (nia) दोन जणांना अटक केली आहे. आरोपी संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना एनआयएने अटक केली आहे.Businessman mukesh ambani antilia residance car bomb case two more arrest by nia)

यातील एका आरोपीला लातूर येथून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता पुढील तपास करण्यासाठी 21 जूनपर्यंत त्यांची कोठडी एनआयएला देण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची भूमिका आणि सहभागाबद्दल अधिक माहिती NIA घेत आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पियो कारमध्ये २५ फेब्रुवारीला स्फोटके सापडली होती. या गाडीत २० जिलेटिन कांड्या होत्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे होता. गुन्हे गुप्तचर शाखेचे प्रमुख सचिन वाझे या प्रकरणात तपास करत होते. पण त्यानंतर हा तपास राष्ट्रीत तपास यंत्रणा NIA कडे गेला.

अँटिलिया स्फोटक प्रकरण, लातूरमधून अटक
शिवसेनेने हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी - राम कदम

त्यानंतर वेगाने चक्र फिरली. अनेक खळबळजनक खुलासे झाले, ज्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. NIA ने तपास सुरु केल्यानंतर सर्वप्रथम सचिन वाझेला अटक केली. कारण एनआयएच्या म्हणण्यानुसार, तोच या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. ज्या स्कॉर्पियोमध्ये स्फोटके सापडली, ती कार मन्सुख हिरेन यांच्याकडे होती. आठवड्याभरापूर्वी त्यांनी कार चोरीची तक्रार नोंदवली होती.

अँटिलिया स्फोटक प्रकरण, लातूरमधून अटक
मराठी अभिनेत्याच्या अटकेवरुन भातखळकर संतापले, शिवसेनेवर प्रहार

तपास सुरु असतानाच पाच मार्चला मन्सुख हिरेन यांचा ठाण्याच्या खाडीत मृतदेह सापडला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मन्सुख हिरेन आणि सचिन वाझे हे मित्र असल्याचं नंतर स्पष्ट झालं. मन्सुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा नंतर समोर आलं. मन्सुखच्या मृत्यूला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. पण कटामध्ये सचिन वाझेचाच होता. त्यानेच ही हत्या घडवून आणल्याचे पुरावे नंतर समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()