आता 'कन्यारत्न' होताच मिळणार 5 हजारांचा धनादेश; 'या' उद्योगपतीच्या अनोख्या उपक्रमाचा 100 कन्यांना मिळाला लाभ

ओम नमो भगवते वासुदेवाय (ओएनबीवी) या सामाजिक संघटनेच्या वतीने (Social Organization) गोरगरिबांना सातत्याने मदतीचा हात देण्यात येत आहे.
Businessman Sanjay Gupta
Businessman Sanjay Guptaesakal
Updated on
Summary

खासगी रुग्णालयात प्रसूतीचा अमाप खर्च झेपता येत नसल्याने आणि परिस्थिती हलाखीची असल्याने गोरगरीब महिला शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होतात.

उल्हासनगर : महानगरपालिकेने (Ulhasnagar Municipal Corporation) डिसेंबरच्या रात्री 12 ते 1 जानेवारी दरम्यान जन्मलेल्या कन्यारत्नांना एक लाख रुपये देण्याची योजना यापूर्वी राबवलेली आहे. मात्र, ओम नमो भगवते वासुदेवाय (ONBV) या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी या पलिकडे जाऊन उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयात कधीही आणि कोणत्याही तारखेला गोरगरीब महिलेला कन्यारत्न झाले, तर कन्येच्या खात्यात जमा करण्यासाठी 5 हजार रुपयांचा धनादेश देण्यास सुरुवात केली आहे.

संजय गुप्ता हे उद्योगपती असून त्यांच्या ओम नमो भगवते वासुदेवाय (ओएनबीवी) या सामाजिक संघटनेच्या वतीने (Social Organization) गोरगरिबांना सातत्याने मदतीचा हात देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजय गुप्ता यांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सर्वधर्मीय गोरगरीब महिलेला कन्यारत्न झाल्यावर त्यांच्या घरी जाऊन कन्येच्या नावाने 5 हजार रुपयांचा धनादेश आणि नवीन कपडे देण्याचा अनोखा असा आगळावेगळा उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 100 कन्यांना लाभ झाला आहे.

Businessman Sanjay Gupta
हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय? गरोदर स्त्रीयांवर कोणता होतो परिणाम? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

खासगी रुग्णालयात प्रसूतीचा अमाप खर्च झेपता येत नसल्याने आणि परिस्थिती हलाखीची असल्याने गोरगरीब महिला शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होतात. अशावेळी महिलेला कन्यारत्न झाल्यावर त्यांचा घराचा पत्ता रुग्णालयातून घेऊन आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कन्येच्या नावाने 5 हजाराचा धनादेश व नवीन कपडे देण्यात येतात. धनादेश बँकेच्या खात्यात केल्याने कन्या 20 वर्षांची होईपर्यंत ही रकम अनेक पटीने वाढणार असून ती तिच्या कामी पडणार आहे. जोपर्यंत जीवात जीव असणार, तोपर्यंत हा उपक्रम राबवत राहणार, अशी माहितीही संजय गुप्ता यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.