पावसाळा नाही तरीही मतदारांसाठी निवडणुकीच्या तोंडावर छत्री खरेदी

निवडणुकीच्या तोंडावर रस्ते, नाल्याची दुरुस्ती अशा विकास कामांना पेव सुटतो. मात्र, आता मतदारांना भुलविण्यासाठी साड्या, छत्री वाटप, टिफीन बॉक्सचे वाटपही निवडणुकीच्या तोंडावर केले जाणार आहे.
Umbrella
UmbrellaSakal
Updated on
Summary

निवडणुकीच्या तोंडावर रस्ते, नाल्याची दुरुस्ती अशा विकास कामांना पेव सुटतो. मात्र, आता मतदारांना भुलविण्यासाठी साड्या, छत्री वाटप, टिफीन बॉक्सचे वाटपही निवडणुकीच्या तोंडावर केले जाणार आहे.

मुंबई - निवडणुकीच्या (Election) तोंडावर रस्ते, नाल्याची दुरुस्ती अशा विकास कामांना (Development work) पेव सुटतो. मात्र, आता मतदारांना भुलविण्यासाठी साड्या, छत्री वाटप, टिफीन बॉक्सचे वाटपही निवडणुकीच्या तोंडावर केले जाणार आहे. तेही महानगर पालिकेच्या निधीतून. कुर्ला येथे साडी, छत्र्या, टिफीन बॉक्स खरेदीसाठी महानगरपालिकेने निवीदा मागवल्या आहेत.

महानगर पालिकेकडून नगरसेवकांना विकास निधीसह काही अतिरीक्त निधी पुरवला जातो.हा दोन्ही निधी मिळून रक्कम 1 कोटी रुपयांच्या वर असते. यात प्रभागातील विकास कामे होणे अपेक्षीत आहे. मात्र, गेल्या काही वर्षात नगरसेवकांकडून प्रसिध्दीच्या योजना राबवल्या जातात. कुर्ला परीसरातील दोन प्रभागात छत्रीचे वाटप होणार आहे. तर, दोन प्रभागात साड्यांचे वाटप होणार आहे. त्याच बरोबर दोन प्रभागात टिफीन बॉक्सचेही वाटप होणार आहे. यासाठी महानगर पालिकेच्या कुर्ला प्रभागाकडून निवीदाही मागविण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने 2016 मध्ये परीपत्रक प्रसिध्द करुन नगरसेवक निधीतून कोणत्या सुविधा पुरविता येतात याबाबात स्पष्टता आणली आहे. त्यात दिलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी नरसेवक निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे नियमानुसारच ही तरतूद असल्याचा दावा नगरसेवकांकडून केला जातो.

Umbrella
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामुळे वाहतूक खोळंबली

प्रसिध्दीचा उच्चांक

महानगर पालिकेच्या निवडणुका होणार असल्याने यावर्षी नगरसेवकांनी प्रसिध्दीभुमिक योजनांसाठी आर्थिक तरतूद करुन घेतली होती. यात, ज्यूट, कापडी पिशव्यांचे वाटप, सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी वाहाने, साड्या वाटप, लॅपटाॅप वाटप, टिफीन बॉक्स वाटप, शिलाई मशिन वाटप अशा अनेक योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यातील अनेक योजना पुर्ण होऊ शकत नसल्याने नंतर हा निधी विकास कामांसाठी वळविण्यात आला.

योजना नाही पण फुट ट्रकसाठी तरतूद

महानगर पालिका फुड ट्रक साठी धोरण तयार करणार आहे. मात्र, हे धोरण अद्याप तयार झालेले नाही. मात्र, या फुड ट्रकच्या वितरणासाठी अनेक नगरसेवकांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी निधीची तरतूद करुन ठेवली होती. मात्र, अद्याप हा निधी वापरला गेला नाही. तर, काही प्रभागात हा निधी इतर कामांसाठी वळविण्यात आला. हे धोरण तयार होत नसल्या बद्दल प्रशासनावर नगरसेवकांनी नाराजीही व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.