Vasai Virar: वसई विरारचा पाणी प्रश्न सुटणार, देहेरजेमधून महानगरपालिकेला मिळणार तब्बल इतके पाणी

Water Problem : सन २०५५ पर्यंतच्या प्रकल्पित लोकसंख्येस आवश्यक असणाऱ्या पाण्याचे नियोजन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
Vasai Virar: वसई विरारचा पाणी प्रश्न सुटणार,  देहेरजेमधून महानगरपालिकेला मिळणार तब्बल इतके पाणी
Updated on

संदीप पंडित

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सन २०५५ च्या प्रकल्पित लोकसंख्येस पुरेसे पाणी उपलब्ध होण्याकरीता "देहेरजे मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्याबाबतच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या मागणी नुसार उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

या बैठकीत वसई-विरार शहर महानगरपालिकेस २०३१ पर्यंत १९० द.ल.ली. प्रतिदिन पाणी देहेरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर शिक्का मोर्तब करण्यात आले त्यामुळे भविष्यातील वाढत्या लोकसंख्येस पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देहरजी प्रकल्पासाठी बसई विरार महानररपालिकेने रु.१६५ कोटी रक्कम जलसंपदा विभागाला सन २०१४-१५ मध्ये वर्ग केली असल्याचे तसेच धरणातून वसई विरार महानगरपालिकेस जलसंपदा विभागाने दि.०४/०३/२०१४ च्या शासन निर्णयानुसार पिण्याचे पाणी आरक्षित केले आहे.

सदर पाणी यापुढेही तसेच ठेवण्याची व वसई विरार महानगरपालिकेच्या वाट्याचे पाणी इतर कुठेही न देणेबाबत मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, यांच्याकडे केली, तसेच देहेरजी धरणावरून सन २०३१ पर्यंत महापालिकेस पाणी उपलब्ध होण्याकरीता पाणी पुरवठा योजना तयार करून पाणी उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली

. हितेंद्र ठाकूर यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाने यापूर्वी शासन निर्णय दि. ०४/०३/२०१४ प्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा विभागास व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिले आहेत. तसेच देहेरजी धरणावरून पाणी पुरवठा योजना तयार करून महापालिकेस सन २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना MMRDA ला देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री,देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार हितेंद्र ठाकूर (वसई), आमदार क्षितीज ठाकूर (नालासोपारा), आमदार राजेश पाटील (बोईसर), आमदार निरंजन डावखरे (कोंकण पदविधर मतदार संघ) आदी मान्यवर तसेच जलसंपदा विभाग व उर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, कार्यकारी संचालक (KIDCL), महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता (जलसंपदा), कार्यकारी अभियंता (MMRDA) इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

याव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते नारायण मानकर, .प्रफुल्ल साने हे देखील उपस्थित होते.वरील निर्णयामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेस सन २०३१ पर्यंत १९० द.ल.ली. प्रतिदिन पाणी देहेरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणार असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येस पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या व्यतिरिक्त खोलसापाडा १ व खोलसापाडा-२ तसेच सुसरी या प्रकल्पातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे सन २०५५ पर्यंतच्या प्रकल्पित लोकसंख्येस आवश्यक असणाऱ्या पाण्याचे नियोजन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()