भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांच्यात दुहेरी लढत रंगणार आहे. जामसुतकर यांच्या प्रचार रॅलींना मिळणारा प्रतिसाद पाहता या दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, असे दिसत आहे.
मतदानाला काही दिवसच शिल्लक असल्याने प्रचार फेरी, मतदारांच्या भेटीगाठी यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे.