Crime News : केबल व्यावसायिकाला फेसबुक मैत्रिणीने घातला गंडा

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेने डोंबिवलीतील एका केबल व्यावसायिकाला 4 लाख 75 हजाराला गंडा घातल्याची घटना घडली आहे.
Crime News : केबल व्यावसायिकाला फेसबुक मैत्रिणीने घातला गंडा
Updated on
Summary

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेने डोंबिवलीतील एका केबल व्यावसायिकाला 4 लाख 75 हजाराला गंडा घातल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली - फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेने डोंबिवलीतील एका केबल व्यावसायिकाला 4 लाख 75 हजाराला गंडा घातल्याची घटना घडली आहे. महेश पाटील (वय 48) असे केबल व्यावसायिकाचे नाव आहे. महेश यांनी मैत्रिणीला एका हॉटेलवर जेवण्यास बोलावले असता तेथे दोघांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर महेश हे लघुशंकेसाठी गेल्याचा फायदा घेत मैत्रिणीने त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यासह रिव्हॉल्व्हर चोरुन महिलेने पळ काढला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संस्कृती खेरमनकर या नावाच्या महिले विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महेश पाटील हे व्यवसायाने केबल व्यावसायिक असून सागावं परिसरात ते राहतात. त्यांच्या फेसबुवकर खात्यावर एक दिवस संस्कृती खेरमनकर नावाच्या महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्विकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. या ओळखीतून महेश यांनी संस्कृती हिला जेवणाची ऑफर केली. 20 डिसेंबरला खोणी येथील कोहीनुर हॉटेलमध्ये त्यांनी त्यासाठी एक रुम देखील बुक केला. याठिकाणी त्यांनी जेवण व मद्य प्राशन केले. रात्री 11 च्या सुमारास महेश हे लघुशंकेसाठी गेले. या संधीचा फायदा घेत संस्कृती हिने महेश यांचे रिव्हॉल्व्हर, मोबाईल, सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 75 हजाराचा ऐवज चोरुन तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर महेश पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत संस्कृती हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.