मुंबई : आरोप सिद्ध न करता पतीची बदनामी करणे आणि त्याला बाहेरख्याली आणि दारुडा म्हणणे हे 'क्रूरता'च, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासह पुण्यातील एका दाम्पत्याचे कौटुंबिक न्यायालयाने केलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने नोव्हेंबर २००५ मध्ये मंजूर केलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे लग्न रद्द करण्याची मागणी करणारी 50 वर्षीय महिलेची याचिका फेटाळून लावली.
उच्च न्यायालयात अपीलाच्या सुनावणीदरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला प्रतिवादी म्हणून अर्जात जोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. महिलेने अपिलात दावा केला होता की तिचा नवरा बाहेरख्याली आणि दारुडा होता. या अत्याचारांमुळे तिला तिच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते.
यावर पतीच्या चारित्र्यावर विनाकारण आणि खोटे आरोप करून पत्नीच्या वागणुकीमुळे समाजात पतीची प्रतिमा खराब होत आहे. ही बाब क्रौर्याच्या श्रेणीत येते, असे खंडपीठाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले की, पत्नीने तिच्या वक्तव्याव्यतिरिक्त कोणताही पुरावा सादर केलेला नाही, जेणेकरून तिच्या आरोपाची पडताळणी करता येईल. पुरुषच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की याचिकाकर्त्या महिलेने खोटे आणि बदनामीकारक आरोप करून पतीला मानसिक त्रास दिला.
उच्च न्यायालयाने पतीने कौटुंबिक न्यायालयासमोर दिलेल्या निवेदनाचा संदर्भ दिला, ज्यात पत्नीने त्याला त्याच्या मुलांपासून आणि नातवंडांपासून वेगळे केले असल्याचा दावा केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.