Mahrashtra Politics: जे होतंय ते दुर्दैवी! चव्हाण यांनी राजीनामा दिला यावर विश्वास बसत नाही - जितेंद्र आव्हाड

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामागील सत्य अज्ञात - आव्हाडांची प्रतिक्रिया
NCP Jitendra Awhad On ink thrown on BJP chandrakant patil maharashtra News
NCP Jitendra Awhad On ink thrown on BJP chandrakant patil maharashtra News esakal
Updated on

Jitendra Avhad : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही पण वाईट वाटतं, ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासून मंत्रिपद दिलं. मंत्रीपद महत्वाचं नाही मात्र चव्हाण यांचे घराणे हे काँग्रेसच्या विचारांचे होते. शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते.

NCP Jitendra Awhad On ink thrown on BJP chandrakant patil maharashtra News
Mumbai News: पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन!

अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते. असं काय झालं की त्यांना पक्ष सोडावा लागतोय माझा विश्वास बसत नाही मात्र जे होतंय ते दुर्दैवी आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण येथे आपले मत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे आव्हाड यांनी आपले प्रतिक्रिया देताना जे होतंय ते दुर्दैवी असे म्हटले आहे.

सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली स्पर्धा ही धोकादायक गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. सत्ताधारी पक्षांमधील असलेली ही स्पर्धा आणखी धोकादायक आहे. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे स्पष्ट आहे की विद्रोहाचा आवाज जगू देणार आहात की नाही. विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहात का. जर आवाज जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसं काम करणार हा प्रश्न आहे असे देखील ते म्हणाले.

NCP Jitendra Awhad On ink thrown on BJP chandrakant patil maharashtra News
Mumbai Local News : 87 लोकलचा खोळंबा, नेमकं प्रकरण काय? | Mumbai News

खासदार श्रीकांत शिंदे यांना इतिहास माहित नसावा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत एक वक्तव्य केलं आहे त्याबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नसावी. कर्तृत्वाची ओळख नसावी. फुले, शाहू, आंबेडकरांची देखील ओळख नसेल. इतिहास माहीत नसला कि अशा चुका होत असतात, होत राहतात असा टोला देखील  त्यांनी लगावला

NCP Jitendra Awhad On ink thrown on BJP chandrakant patil maharashtra News
Mumbai Local News : 87 लोकलचा खोळंबा, नेमकं प्रकरण काय? | Mumbai News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.