मनसुख प्रकरणात फोक्सवॅगन कारच कनेक्शन, मानेशी काय संबंध?

काय म्हटलयं बडतर्फीच्या आदेशात
Sunil-Mane-Mumbai-Police
Sunil-Mane-Mumbai-Police
Updated on

मुंबई: मुंबई गुन्हे शाखेचा माजी पोलीस निरीक्षक सुनील धर्मा मानेला (Sunil Mane) सेवेतून बडतर्फ (Dismiss) करण्यात आले आहे. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील माने NIA च्या अटकेत आहे. संविधानाच्या कलम 311अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी सुनील मानेवर बडतर्फीची ही कारवाई केली. (Car used for mansukh Hirans murder brought by cop Sunil Mane)

एनआयएने केलेल्या तपासाच्या आधारावर या प्रकरणात सुनील मानेची भूमिका महत्त्वाची होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. माने त्याच्या मित्राकडून फोक्सवॅगन कार घेऊन आला. मनसुख हिरेनचं अपहरण आणि हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आला, असं बडतर्फीच्या आदेशात म्हटलं आहे.

Sunil-Mane-Mumbai-Police
भयानक! नवऱ्याची हत्या करुन बायकोने किचनमध्ये पुरला मृतदेह

"मानेने मुख्य आरोपी सचिन वाझेकडून मोबाइल फोन आणि सीम कार्ड्स घेतले, त्याचा वापर मनसुखच्या अपहरणासाठी केला. महत्त्वाचं म्हणजे सुनील मानेनेच तावडे या बनावट नावाने मनसुख हिरेनला फोन केला. कांदिवलीतून तावडे पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय असे सांगून सुनील मानेने मनसुख हिरेनला घराबाहेर बोलावले व त्यानंतर मनसुखला निर्जन स्थळी नेऊन त्याची हत्या केली" असे बडतर्फीच्या आदेशात म्हटले आहे.

Sunil-Mane-Mumbai-Police
लोकलमध्ये मोबाइल चोराला पकडण्याच्या झटापटीत तिचं आयुष्य संपलं

NIA ने सुनिल मानेला अटक केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य गृहमंत्रलयाला पाठविला होता. त्यानुसार 24 एप्रिलला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष 11 चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय एनआयएला आहे. 3 मार्च रोजी सचिन वाझे यांच्या सीआयययूच्या केबिनमध्ये बैठक झाली होती. त्यात सुनील मानेही उपस्थित होते. या बैठकीत मनसुखला गुन्हा कबुल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.