बापरे! काळजी घ्यायलाच हवी; दिवाळीत 5 लाख प्रवासी वाढणार

बापरे! काळजी घ्यायलाच हवी; दिवाळीत 5 लाख प्रवासी वाढणार
Updated on

मुंबई : कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याच्या भावनेमुळे राज्यभरातील प्रवासात मोठी वाढ होणार आहे.  महाराष्ट्रात दिवाळीदरम्यान सुमारे 5 लाख प्रवासी बसने प्रवास करतील असा अंदाज रेडबस या भारतातील सर्वांत मोठ्या ऑनलाइन बस तिकिटिंग प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत झालेल्या जोरदार आंतरशहर बस आरक्षणांतून स्पष्ट झाले आहे. त्यासाठी सुरक्षेचे सर्व उपाय केले जात असून प्रवाश्यांनी ही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अवघ्या महाराष्ट्रात दिवाळी सण कुटुंबियांसोबत साजरा करण्यात येतोय. रेडबसवर दिवाळीसाठी 14 दिवस आधीपासूनच बुकिंग सुरू झाले. वर्षातील सर्वाधिक प्रवासाच्या काळाची मागणी पूर्ण करण्यासाठी 435 खासगी बस ऑपरेटर्सनी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) साथीने कंबर कसली आहे. सुमारे 10,000 दैनंदिन फेऱ्या चालवल्या जात आहेत. या फेऱ्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या आठवड्यात सुमारे 5 लाख प्रवाशांचे परिवहन होणे अपेक्षित आहे. या प्रवासाचे एकत्रित अंतर 5.5 कोटी किलोमीटर होईल असा अंदाज आहे.

रेडबसने आत्तापर्यंत जाहीर केलेल्या डेटानुसार, पुणे आणि नागपूर या शहरांदरम्यानचा मार्ग हा महाराष्ट्रात दिवाळीच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेला मार्ग आहे. राज्यात 19 महत्वाचे माग असून यावर सर्वाधिक प्रवास केला जातो. सध्याच्या बुकिंग्जपैकी सुमारे 70 % राज्यांतर्गत प्रवासासाठी आहेत, तर 30 % आंतरराज्य प्रवासासाठी आहेत. सध्याच्या बुकिंग्जपैकी 76 % बुकिंग्ज वातानुकूलित बसेससाठी करण्यात आली आहेत. 

रेडबसवर प्रवासासाठी उच्च मागणी असलेल्या महाराष्ट्रातील आघाडीच्या 5 शहरांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे. यंदाच्या दिवाळीत बुकिंग झालेला सर्वांत लघु आंतरशहर बसमार्ग शेगाव आणि खामगाव या दोन शहरांदरम्यानचा मार्ग आहे. हा मार्ग 17.5 किलोमीटर्सचा असून, हे अंतर 25 मिनिटांत कापले जाते. सर्वांत दीर्घ मार्ग मुंबई आणि पाटणा यांदरम्यानचा आहे. महाराष्ट्रातून बिहारमध्ये जाणारा हा मार्ग 1722 किलोमीटर्सचा असून, 36 तासांत कापला जातो.
सणासुदीच्या गर्दीतही सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने केला जात आहे. रेडबसद्वारे मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यांच्या सेफ्टी प्लस कार्यक्रमातील नियम बस ऑपरेटर्स व प्रवासी दोघांनाही लागू आहेत. त्यानुसार, सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना प्रवास करत असताना मास्क घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहनामध्येच हात निर्जुंतुक करण्याच्या सुविधा देणे आवश्यक आहे. बसमध्ये चढताना शरीराचे तापमान तपासले जाईल तसेच प्रत्येक फेरीनंतर प्रस्थापित नियमांनुसार बसेसचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

राज्यात सध्या कोरोनाकाळ सुरू आहे. या दरम्यान प्रवासी मोठ्या संख्येने बाहेर पडणार असल्याने संसर्ग पसरण्याची बिती व्यक्त होत आहे. त्यामुळे पार्टनर बस ऑपरेटर्स प्रवाशांना सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षिततेचे काटेकोर उपाय लागू करत आहेत. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी जबाबदारीने वागण्यास प्रोत्साहन देण्याकरता रेडबसने सूचनांची यादी तयार केली आहे. बसप्रवास हळुहळू पूर्वपदावर येत असल्याने आंतरशहर बस प्रवासासाठी वाढलेली मागणी सणासुदीच्या काळानंतरही टिकून राहणे अपेक्षित आहे. 

Care must be taken 5 lakh passengers to be added on Diwali

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.