Mumbai News : अरबी समुद्रातील त्या बोटी विरोधात येलो गेट पोलिसात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

ओएनजीसीच्या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करणे तसेच पाकिस्तानी खलाशांबाबत खोटी माहिती दिल्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल
case filed against 14 people in Yellow Gate Police against Arabian Sea boat
case filed against 14 people in Yellow Gate Police against Arabian Sea boatesakal
Updated on

मुंबई : मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून 55 नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेल्या जलराणी बोटीप्रकरणी अखेर सोमवारी मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी बोटीचा तांडेल व 14 खलाश्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

ओएनजीसीच्या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करणे तसेच पाकिस्तानी खलाशांबाबत खोटी माहिती दिल्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओएनजीसीचे अधिकारी पियुष कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिबंधित क्षेत्रात शिरकाव

मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून 55 नौटीकल मैलावर शनिवारी दुपारी ओएनजीसीच्या प्रतिबंधीत क्षेत्रात शनिवारी 1 एप्रिल रोजी जलराणी बोट शिरली होती. बोटीने तटरक्षक दलाच्या गस्त नौकेने दिलेले आदेश पाळले नाहीत.

तटरक्षक दलाने अखेर बोट ताब्यात घेतली होती. या बोटीत बोटीचे मालक, त्यांचा मुलगा आणि 13 खलाशी आहेत. यातील 4 खालशी झारखंडचे तर उर्वरित 5 जण छत्तीसगडचे आहेत. सर्व खलाश्यांची आणि बोटीची कागदोपत्री माहिती तपासल्यानंतर त्यांना पुन्हा उत्तन येथे जाण्याच्या सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या होत्या.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

बोटीच्या तांडेलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बोटीवरील दोन खलाश्यानी पाकिस्तानी असल्याची खोटी माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल केली. बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. मात्र अधिक तपासात ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जलराणी’ असे या मच्छिमार बोटीचे नाव असून ती उत्तनच्या बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.