परमबीर सिंह देशाबाहेर फरार, तपास यंत्रणेला संशय

परमबीर सिंह
परमबीर सिंह e sakal
Updated on

Case of extortion against Param Bir Singh: भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणी मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यात, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. तसेच चार दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालकांनी राज्याच्या गृहविभागाकडे केली आहे. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. यावर गृहविभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत माहिती मागविण्यात आली असून त्यानंतर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. अटकेची टांगती तलवार आणि निलंबनाच्या कारवाईमुळे परमबीर सिंह यांनी देश सोडल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने (NIA) मुंबईचे परमबीर सिंह यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले. तसेच चांदिवाल आयोगानेही जबाब नोंदवण्यास हजर राहण्यास समन्स बजावला होता. मात्र, परमबीर सिंह यांनी एकदाही हजेरी लावली नाही. त्यामुळेच अटकेच्या भीतीने परमबीर सिंह यांनी देश सोडल्याचा संशय एनआयए आणि महाराष्ट्र राज्य तपास यंत्रणांना संशय आहे. वारंवार समन्स बजावल्यानंतरही परमबीर सिंह यांनी हजेरी लावली नव्हती. ते घरीही नव्हते. त्यानंतर परमबीर सिंह यांचा तपास यंत्रणेनं शोध सुरु केला. एनआयएची टीम छत्तीसगड, रौहतकसह काही ठिकाणी गेली पण सिंह कुठेही सापडले नाही. त्यामुळे परमबिरचा शोध घेण्यासाठी एनआयएच पथक कामाला लागले आहे.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सचिन वाजेच्या अटकेनंतर सुरू असलेल्या अँटेलिया प्रकरणाचा तपासादरम्यान, परमबीर सिंह यांना एप्रिल महिन्यात एनआयए कार्यालयात बोलावले होते. या चौकशीला परमबिर सिंह हे मलबार हिल येथील एनआयए कार्यालयात हजर राहिले होते. त्यावेळी एनआयएने सचिन वाजे याच्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा भडीमार परमबीर सिंह यांच्यावर केला होता. अँटिलियाची घटना उघडकीस आली तेव्हा तपास वाजेकडेच का दिला? तसेच वाजे थेट तुम्हालाच का रिपोर्ट करायचा? या सारख्या असंख्य प्रश्नांचा परमबीर सिंह यांच्यावर भडिमार करण्यात आला होता. दररोज या प्रकरणातून नवनवीन खुलासे समोर येत होते. मात्र एनआयएने या प्रकरणात आरोपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात असे अनेक पुरावे एनआयएला मिळून आले आहेत. ज्यात परमबिर सिंह यांचा या प्रकरणात संबध असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर अटकेची भिती व्यक्त केली जात आहे. या भितीपोटीच परमबीर सिंह यांनी देशातून पलायन केल्याचं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()