स्टंटबाज शुभम मितालियासह अल्पवयीन कारचालक आणि त्याच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली : बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) बोनेटवर बसून भररस्त्यात काही तरुणांनी स्टंटबाजी केली खरी, परंतु आता हीच स्टंटबाजी त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी (Police) अटक केली आहे. विशेष म्हणजे, ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी स्टंटबाज तरुण शुभम मितालिया याच्यासह कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि सदर अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमध्ये काही हुल्लडबाज तरुणांचा प्रताप समोर आला आहे. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan-Dombivli Municipal Corporation) मुख्यालयासमोरुन एक बीएमडब्ल्यू कार येताना दिसली.
या कारला पाहताच रस्त्यावरील पादचारी आणि अन्य वाहन चालक आश्चर्य व्यक्त करीत होते. कारचा बोनेटवर एक तरुण हातपाय पसरून बसून कारच्या राईटचा आनंद घेत होता. भररस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर बसून ती कार रस्त्यावर सुसाट धावत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून चांगलाच व्हायलर झाला.
सदर व्हिडिओ बाजारपेठ पोलिसांच्या हाती जाताच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्या स्टंटबाज तरूणाचा शोध पोलिसांनी सुरु केला. व्हिडिओमध्ये आढळून येणारी कार आणि स्टंटबाज मुलगा यावरून या कारचा शोध घेतला. पोलिसांनी कारवर बसून स्टंट करणाऱ्या शुभम मितालिया आणि कार चालविणाऱ्या अल्पवयीन तरूणाला ताब्यात घेतले.
शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. तर, कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेकडे राहणारा आहे. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली आहे. या दोघांना ताब्यात घेतले. स्टंटबाज शुभम मितालियासह अल्पवयीन कारचालक आणि त्याच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आवाहन केले आहे. पालकांनी काळजी घेतली पाहिजे. आपले कुठलेही वाहन आपल्या अल्पवयीन पाल्याच्या हातात देऊ नये, अन्यथा चालक आणि मालक अशा दोघांवरही कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.