Latest Marathi News: डोंबिवली मधील 42 वर्षीय सुधाकर यादव यांनी आठ महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुधाकर यांचा भाऊ प्रभाकर यांच्या तक्रारीवरून सोमवारी विष्णुनगर पोलिसांनी सुधाकर यांची पत्नी व अन्य तीन जनांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील भगवान काठेनगरमध्ये राहत असलेल्या सुधाकर यादव यांनी डिसेंबर 2023 मध्ये राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सुधाकर यांचा भाऊ प्रभाकर हा बदलापूर येथे राहण्यास असून मे 2024 मध्ये त्यांनी विष्णुनगर पोलिसांना भावाच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी याविषयी अर्ज केला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रभाकर यांच्या चौकशी नुसार यांच्या तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. प्रभाकर यांच्या तक्रारीनुसार सुधाकर याने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने मृत्यूस जबाबदार पत्नी संजना यादव तसेच महम्मद शेख, महेश पाटील व एक अनोळखी इसम यांना जबाबदार धरले आहे.
संजनाने महम्मद शेख, महेश पाटील आणि एक अनोळखी इसम यांच्या सहकार्याने आपल्या पतीचा मानसिक छळ केला. त्याला विविध प्रकारे त्रास देऊन त्याला जीवन जगणे हैराण केले. पत्नीसह तिच्या मित्रांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आठ महिन्यापूर्वी सुधाकर यादव यांनी राहत्या घरात घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप केला आहे.
सुधाकर याचा भाऊ प्रभाकर याने पोलीस ठाण्यात याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार तपास करत त्यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी सांगितले. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. बी. देवरे यांनी याप्रकरणाचा तपास केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.