Shivsena News: ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद..

भोईर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप
 case registered Corruption Act against former Mumbai corporator yogesh bhoir of Thackeray group politics
case registered Corruption Act against former Mumbai corporator yogesh bhoir of Thackeray group politicssakal
Updated on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भोईर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे.

उद्धव ठाकरे गटातील नेते व पदाधिकाऱ्यांविरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरूच असून आता एसीबीने योगेश भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

योगेश भोईर समता नगर प्रभाग 24 येथील माजी नगरसेवक आहेत. भोईर यांनी 85 लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

 case registered Corruption Act against former Mumbai corporator yogesh bhoir of Thackeray group politics
Udhav Thackrey: ठाकरे गटाला पुन्हा धक्का! वैभव नाईकांनंतर आणखी एका आमदाराला ACBची नोटीस

योगेश भोईर यांच्यावर ज्ञात मिळकतीपेक्षा जास्त अपसंपदा जमवल्याचा आरोप आहे. नगरसेवक पदाच्या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा 85 लाख 56 हजार 562 रुपये अधिक मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

त्यामुळे भोईर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एसीबीने शोध मोहिमही राबवली.

 case registered Corruption Act against former Mumbai corporator yogesh bhoir of Thackeray group politics
Uddhav Thackrey : नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; कशी असणार नवी घटना?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी डिसेंबर, 2020 मध्ये भोईर यांच्याविरोधात खंडणीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

याप्रकरणातील सहआरोपी गणेश ठाकूर आणि दिनेश ठाकूर या दोन बंधूंकडून देवाराम दर्गाराम चौधरी यांनी तीन टक्के सावकारी व्याजाने 22 लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते.

 case registered Corruption Act against former Mumbai corporator yogesh bhoir of Thackeray group politics
Uddhav Thackeray : ...त्यामुळे ठाकरे पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

2015 पर्यंत त्यांनी व्याजासहीत 24 लाख 65 हजार रुपये त्यांना परत केले होते. मात्र ही रक्कम देऊन ते दोघेही त्यांच्याकडे दहा टक्के व्याजदाराने आणखी पैशांची मागणी करीत होते.

याचदरम्यान त्यांना ठाकूर यांच्या वतीने योगेश भोईर यांनी साडेसात लाख रुपये परत करण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()