Mumbai : वसई दरड मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल; गुन्हे शाखा करणार तपास

landslides Vasai Latest Marathi News
landslides Vasai Latest Marathi Newsesakal
Updated on

वसई (जि. पालघर) : वसईच्या वाघरळपाडा येथे एका घरावर दरड (Landslide) कोसळून बुधवारी बाप लेकीचा मृत्यू (Death) झाला तर आई व मुलगा जखमी झाले आहेत. याप्रकरणी वसई विरार महापालिकेने (Vasai Virar Municipal Corporation) चाळी उभारणाऱ्यांना जबाबदार धरत वालीव पोलिसांत एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामे होत असल्याचे समोर आले आहे. (Case registered in Vasai landslide death case Crime branch will investigate Mumbai latest Marathi News)

डोंगराला लागून असलेल्या खोलीवर मोठा दगड , मातीचा भाग कोसळला त्यामुळे या भागात बांधकामे कशी केली गेली असा प्रश्न निर्माण होत आहे. वसई विरार महापालिका अभिलेखावरून माहिती मिळवत राजावली जुना सर्व्हे क्रमांक 137 व नवीन 146 हिस्सा नंबर 1 ही जागा मेरी ग्रेशियस यांच्या मालकीची आहे असे सहाय्यक आयुक्त नीलम निजाई यांना समजले याठिकाणी बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.

तसेच शैलेंद्र निषाद ,रत्नेश पांडे , अनिलकुमार दुबे ,अजित सिंग व इतर यांच्यावर विनापरवाना अनधिकृतपणे मुरूम मातीच्या टेकडीचा काही भाग तोडून कच्च्या भिंती , पत्रे टाकून धोकादायक रित्या व बेकायदेशीरपणे बैठ्या चाळी बांधून विक्री केल्या व भाडेतत्वावर दिल्या आहेत अशी फिर्याद महापालिका वालीव प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त नीलम निजाई यांनी वालीव पोलीस ठाण्यात करताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मृत्यपप्रकरणी देखील गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामाला जबाबदार धरणाऱ्या पाच जणांची नावे महापालिकेने दिली आहेत त्यामुळे पोलीस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

landslides Vasai Latest Marathi News
नोकरदार मातांसाठी मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; म्हणाले, ''करिअर अन् मूल''...

200 जणांचे स्थलांतर

अतिकवृष्टीचा इशारा व दरड कोसळल्याची भीती लक्षात घेता वाघरळपाडा येथील चाळीत राहणाऱ्या 200 जणांचे अशा आश्रम येथे स्थलांतर केले तर 79 खोल्यातील नागरिकांची घरे रिकामी केली आहेत याचबरोबर महापालिकेकडून जेवणाची व्यवस्था देखील केली आहे अशी माहिती प्रशासनाने दिली.

"राजावली वाघरळ पाडा येथे दरड कोसळून झालेल्या मृत्यूचा तपस गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून महापालिका अधिकाऱ्यांनी दाखल एमआरटीपीच्या फिर्यादींबाबत तपास वालीव पोलिसांकडून करण्यात येत आहे." - संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त

"राजावली येथे बैठ्या चाळी उभारण्यात आल्या आहेत पालिकेकडून कोणतीच परवानगी घेण्यात आली नाही.त्यामुळे वालीव पोलीस ठाण्यात जागेचे मालक , बांधकामधारक यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकत असल्याने वाघरळपाडा येथील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे."

- नीलम निजाई - सहाय्यक आयुक्त , महापालिका.

... तर बाप लेकीचा जीव वाचला असता

राजावली येथे डोंगर पोखरला , अनधिकृतपणे चाळी उभारल्या गेल्या , लोक रहायला देखील आली तरी मात्र याचा थांगपत्ता महापालिकेला कसा लागला नाही.यावरून हा आशीर्वाद नेमका कुणाचा, वेळीच कारवाई केली असती तर बाप लेकीचा जीव वाचला असता.

landslides Vasai Latest Marathi News
Mumbai Rain : पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()