Waman Mhatre: अखेर शिंदे गटाच्या म्हात्रेंविरोधात गुन्हा; 'सकाळ'च्या बातमीदाराशी वापरली होती अर्वाच्य भाषा

Waman Mhatre case was filed : बदलापुरात राजकीय वजन असलेल्या म्हात्रेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकारांना तब्बल २८ तासांचा लढा द्यावा लागला.
Waman Mhatre
Waman Mhatre
Updated on

मुंबई- बदलापूर अत्याचार प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या 'सकाळ'च्या महिला बातमीदाराशी अर्वाच्य भाषा वापरणारे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरोधात अखेर २८ तासांनंतर बदलापूर पोलिसांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

बदलापुरात राजकीय वजन असलेल्या म्हात्रेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकारांना तब्बल २८ तासांचा लढा द्यावा लागला. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पोलिस ठाण्यात ठिय्या दिल्याने पोलिसांना नमते घ्यावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.